*जीवनशिल्प*
सद्गुरु म्हणतात,
जीवन फार सुंदर आहे. पण हे जीवनाचे सुंदर शिल्प घडविण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणे जरुरीचे आहे. जीवन शिल्प घडवावे लागते हे येथे लक्षात घ्यावे लागते. आजच्या परिस्थितीत कोणीच हा विचार करत नाही. जसे घडेल तसे जीवनशिल्प घडू दिले जाते. सद्गुरु म्हणतात सुंदर जीवन शिल्प घडविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते. Life should be by design and should not be by default. हे जीवनाचे डिझाईन म्हणजेच जीवनाचे *साध्य* म्हणजेच जीवनाचा Goal जो प्रथम निश्चित असला पाहिजे. जर हे जीवनाचे design निश्चित केलेले नसेल तर सद्गुरु म्हणतात हे जीवनाचे शिल्प सुंदर निर्माण होण्याऐवजी ओबडधोबड जीवनशिल्प आकाराला येते. एकदा साध्य निश्चित झाले की मग त्यानंतर साधनांचा विचार करता येतो. सद्गुरु म्हणतात जीवनशिल्प साकार करण्याकरता आवश्यक ती उपकरणे निसर्गदेवतेने आपल्याला मोठ्या उदार अंत:करणाने विनामूल्य दिलेली आहेत, ती म्हणजे कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये, अंत:करण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, आणि विविध शक्ती जसे स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, भावना शक्ती, वासनाशक्ती इत्यादी. सद्गुरु म्हणतात, यात सगळ्यात महत्त्वाचा प्रथम घटक, प्रथम महत्त्वाची शक्ती आहे ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती नंतर विद्या शक्ती आणि क्रिया शक्ती या क्रमाने येतात. इच्छाशक्ती, विद्या शक्ती आणि क्रिया शक्ती यावर सविस्तर विवरण आपण यापूर्वी प्रयत्न या लेखमालेत केलेले आहे.
सद्गुरु म्हणतात, जीवन जगणे ही एक कला असून जीवन सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने ही कला अवगत केली पाहिजे. शास्त्र शिकविता येते पण कला शिकविता येत नाही ती अवगतच करावी लागते. Art cannot be taught it has to be caught. कला अवगत करायची असेल तर प्रथम ज्ञान हवे, त्यासाठी अभ्यास हवा आणि त्या ज्ञानाचे आचरण करावयास हवे.गायन कला अवगत करायची असेल तर जसा रियाज आवश्यक असतो तसेच कोणतीही कला अवगत करायची असेल तर त्याचा रियाज म्हणजे नित्य सराव आवश्यक आहे. जीवनाच्या कलेचा रियाज म्हणजे जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाचे दैनंदिन जीवनात सतत आचरण करणे.
सद्गुरु म्हणतात, जीवन सुंदर आहे आणि जीवन जगणे सोपे आहे पण सहज नाही. थोडा गोंधळ उडतो ना? सोप वेगळ असते आणि सहज वेगळे असते .कर्म सहज आहे पण सोपं नाही आणि नाम सोप आहे पण सहज नाही. हरिपाठात माऊली म्हणतात, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. येथे आपल्याला सहज आणि सोपं यातला नेमका फरक समजावून घेतला पाहिजे. सोपं काय? आणि सहज काय? तर ज्याच्या प्राप्तीत अडचण येत नाही ते सहज असत आणि ज्याच्या आचारात अडचण येत नाही ते सोपं असतं.
सहज याचा अर्थ जन्माबरोबर आपल्याला जे प्राप्त होतं. म्हणजेच जे जन्मापासून आपल्याबरोबर येतं त्याला सहज म्हणतात. कर्म जन्माबरोबर प्राप्त आहे ना? आम्हाला हातपाय हलवायला कुठे शिकावं लागत नाही. आम्हाला रडायला कोणी शिकवलं नाही. हसायला कोणी शिकवलं नाही. आईने दूध पाजल्यानंतर ते आत ओढायचं असतं ते आम्हाला कोणी शिकवलं नाही. भक्ती शास्त्रात याला भगवंताची प्रबोधिनी कृपा असं म्हणतात. काही काही गोष्टी आपण जन्माबरोबरच घेऊन येतो त्या शिकण्याची गरज नसते हे सहज असत. सोपं काय? तर ज्याच्या आचारात अडचण येत नाही ते सोपं. नाम घेण्यात अडचण नाही पण राम म्हणण्याची बुद्धी होणं ही अडचण आहे. तसंच जीवन जगणे सोपे आहे पण सोपे जीवन जगण्याची बुद्धी होणे अवघड आहे.
सद्गुरु म्हणतात, माणसाला नेहमीच अवघड गोष्टी करायला आवडतात. सोप्या गोष्टी करण्याकडे माणसाचा कल नसतो. झोपणे सोपे आहे पण माणूस जागरण करतो. खरं बोलणं सोपं आहे पण माणूस खोटे बोलतो. तर माणूस नेहमीच अवघड गोष्टी करतो कारण त्याच्या बुद्धीचा पॅटर्न तसा बनलेला असतो.
साधेपणा हा चांगला गुण आहे. हो की नाही? कारण साधेपणामुळे गोष्टी अधिक सुंदर आणि समजण्यास सुलभ होतात. साधेपणा आपल्याला चांगले होण्यास अधिक सर्जनशील होण्यास मदत करते. साधेपणामुळे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. साधेपणा तुम्हाला मोकळे आणि प्रगल्भ विचार करण्यास मदत करतो. साधेपणाने जगणे सोपे आहे पण प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही. लोक किचकट आणि गुंतागुंतीचे मार्ग जीवन जगण्यासाठी निवडतात.
येथे आपल्याला अंत:करण कसे कार्य करते ते समजावून घेतले पाहिजे. अंत:करण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन संकल्प विकल्प करते, संकल्प विकल्पाला निर्णयाप्रत नेण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी मदत करते, त्यासाठी चित्त बुद्धीला मदत करते, आणि अहंकार त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतो. निर्णयापर्यंत येण्यासाठी बुद्धि पाहिजे आणि म्हणूनच सद्गुरूंनी विश्वप्रार्थनेत ईश्वराकडे प्रथम सगळ्यांसाठी चांगली बुद्धी मागितली आहे. चांगली बुद्धी म्हणजे चांगले जीवन उपयोगी निर्णय घेण्याची क्षमता.
निर्णय कसे घ्यावेत यासाठी ओकम यांचे रेझरचे तत्व समजावून घेऊ या.
ओकम चा रेजर हे ओकम विल्यम या तत्त्ववेत्याने दिलेले तत्व आहे. ज्याने आवश्यकते शिवाय बहुविधता मानता कामा नये असे स्पष्ट केले. हे तत्व साधेपणावर भर देते आणि असे सुचविते की प्रतिस्पर्धी सिद्धांतांमध्ये सर्वात कमी गृहीतके असलेल्याला प्राधान्य दिले पाहिजे.
थोडक्यात ओकमचा रेझर हे तत्व असे सांगते की जर आपल्याकडे एकाच घटनेच्या स्पष्टीकरणासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील तर आपण सोप्या पर्यायाची निवड केली पाहिजे.
दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी या तत्त्वाचा कसा उपयोग होतो-
१. *निर्णय घेणे:*
जेव्हा एकापेक्षा
अधिक पर्याय
उपलब्ध असतात
तेव्हा सर्वात सरळ
आणि सर्वात सोप्या
पर्यायाची निवड
करा.
उदाहरणार्थ जेव्हा
दोन मार्गांपैकी एक
मार्ग ठरवायचा
असेल ज्यापैकी एक
मार्ग हा थेट म्हणजे
राजमार्ग म्हणजे
सर्वमान्य आणि
शास्त्रसंमत मार्ग
आहे आणि दुसरा हा
शॉर्टकट आहे ज्यात
एकापेक्षा अधिक
वळणे आणि थांबे
आहेत तर विचार
करण्यासारखे इतर
घटक नसल्यास थेट
मार्ग म्हणजेच
राजमार्ग हा चांगला
पर्याय निवडला
पाहिजे.
२. समस्या निवारण: तांत्रिक किंवा यांत्रिक समस्या निर्माण झाल्यास ती समस्या सोडविण्यासाठी सर्वात सोप्या मार्गाचा अवलंब केल्यास वेळ आणि पैसा वाचू शकतो. उदाहरणार्थ जर एखादे डिवाइस - यंत्र काम करत नसेल तर प्रथम वीज चालू आहे ना? आणि कनेक्शन व्यवस्थित आहे ना? हे तपासणे हे केव्हाही एखादी जटिल समस्या पहिल्यांदाच गृहीत धरण्यापेक्षा सोपे असते.
३. परस्परिक संघर्ष: गैरसमज किंवा आपापसातील संघर्ष सोडवितांना पहिल्यांदाच दूर्भावनेचा विचार न करता सरळ सोपा विचार केला तर समस्या लवकर सुटू शकते. समोरच्या माणसाचा हेतू कदाचित वाईट नसू शकतो. त्याची देखील काहीतरी अडचण असू शकते. असा विचार केल्यास समस्या विनासायास गुंतागुंत न वाढविता सोडवता येऊ शकते.
४. दैनंदिन स्पष्टीकरण जीवनात एखादी गोष्ट का घडली हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना सर्वात सोप्या स्पष्टीकरणाची सर्वात जास्त शक्यता असते उदाहरणार्थ रात्री एखादा आवाज झाल्यास लगेचच अगदी एखादा चोर शिरला तर नसेल नां असा विचार करण्यापेक्षा कदाचित वारा जास्त असल्यामुळे किंवा एखादा पाळीव प्राणी शिरल्यामुळे आवाज झाला असेल अशी शक्यता जास्त असू शकते.
मात्र प्रत्येक वेळेस सदा सर्वदा जीवनात या तत्त्वाचा उपयोग करता येत नाही. त्यावेळी सद्गुरु म्हणतात त्याप्रमाणे, *वस्तुस्थितीचा स्वीकार करून सारासार विचार करून परिस्थितीला योग्य वळण देणेच शहाणपणाचे ठरते* उदाहरणार्थ जेव्हा आरोग्याविषयी किंवा एखाद्या जटील शास्त्रीय सिद्धांताविषयी निर्णय घ्यावयाचा असेल तेव्हा वस्तुस्थिती समजावून घेणे महत्त्वाचे ठरते.
जीवनशिल्प घडविण्यासाठी जी विविध साधने आपल्याला निसर्गाने सहज उपलब्ध करून दिली आहेत त्याचा वापर करण्यासाठी कौशल्य आणि कल्पकता असणे किती आवश्यक आहे त्याची एक चूणुक वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आली असेल. सद्गुरु म्हणतात, जीवनशिल्प घडविण्यास कल्पकता एक महत्त्वाचा घटक आहे. हे कल्पकतेचे वरदान माणसाला अभ्यास, चिंतन आणि गुरुकृपा यांच्या मिलनातून प्राप्त होत असते.
आणि हे सर्व काही जे करायचे आहे ते आपल्यालाच करायचे आहे आणि म्हणूनच सद्गुरु म्हणतात,
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.*
धन्यवाद
सदगुरुनाथ महाराज की जय.
Jayant Joshi
Jeevanvidya Mission
---
Life Sculpting
Sadhguru says,
Life is truly beautiful. However, to craft this beautiful sculpture of life, the right knowledge is essential. We must consciously sculpt our lives instead of letting them take shape randomly. Unfortunately, in today's world, few people think this way. Life is often left to unfold on its own without direction.
Sadhguru emphasizes that creating a beautiful life requires special effort. Life should be by design and not by default. This design refers to having a clear goal or purpose in life. If life is not designed with a specific goal in mind, it takes on a rough and unrefined shape instead of becoming a masterpiece. Once the goal is set, the means to achieve it can be determined.
Sadhguru explains that nature has generously provided us with the necessary tools to shape our lives—our organs of action and perception, our inner faculties like the mind, intellect, memory, and ego, and various mental powers such as imagination, memory, emotions, and desires. Among these, the most crucial power is willpower. Following willpower, knowledge and action take priority in this sequence.
Sadhguru has elaborated on willpower, knowledge, and action in previous discussions on effort.
Life as an Art
Sadhguru says, living life is an art, and to make life beautiful, one must master this art. Science can be taught, but art must be acquired through experience. Art cannot be taught; it has to be caught. To master an art, one must first acquire knowledge, practice regularly, and apply that knowledge in daily life.
Just as mastering the art of singing requires daily practice, mastering the art of life requires the consistent practice of life philosophy.
Sadhguru says, life is beautiful, and living is simple, but not effortless. This distinction is important—simple and effortless are not the same. Action may be effortless, but it is not always simple. Chanting the divine name may be simple, but attaining the wisdom to do so is not effortless.
Saint Tukaram says in Haripath, "The name of God is simple—Ram, Krishna, Govind." Understanding the difference between simple and effortless is crucial.
What is effortless? Anything that comes naturally from birth, such as moving our hands, crying, laughing, or sucking milk as an infant.
What is simple? Anything that can be practiced without difficulty.
For example, chanting the name of God is simple, but developing the intellect to understand its value is not effortless. Similarly, living life is simple, but developing the wisdom to live simply is challenging.
The Human Tendency for Complexity
Sadhguru explains that humans tend to choose difficult paths over simple ones.
Sleeping is simple, yet people choose to stay awake.
Speaking the truth is simple, yet people often lie.
This happens because the patterns of the human intellect are conditioned to prefer complexity.
The Power of Simplicity
Simplicity is a great virtue. It makes things clearer, more beautiful, and easier to understand. It fosters creativity and a positive outlook on life. Living simply allows for open-minded and mature thinking.
Yet, despite its benefits, people often choose complicated and entangled ways to live.
To understand this, we must examine how the inner faculties—mind, intellect, memory, and ego—function.
The mind generates thoughts.
The intellect helps in decision-making.
Memory supports the intellect.
The ego finalizes the decision.
Since good decision-making is crucial for life, Sadhguru, in the Universal Prayer, asks God first for wisdom for all. Good wisdom leads to good decisions, which lead to a fulfilling life.
Occam’s Razor: A Principle of Simplicity
To aid decision-making, we can apply Occam’s Razor, a principle by philosopher William of Ockham. It states:
"One should not assume multiple explanations when a simpler one suffices."
This principle emphasizes simplicity and suggests that among competing theories, the one with the fewest assumptions should be preferred.
Practical Applications of Occam’s Razor
1. Decision-Making:
When multiple choices are available, select the simplest and most straightforward option.
For example, if you need to choose between two roads—one a direct, well-established route and the other a complex shortcut with multiple turns—choose the straightforward one unless other factors demand otherwise.
2. Problem-Solving:
In technical or mechanical issues, always check the simplest causes first.
If a device stops working, check the power supply and connections before assuming a complex internal fault.
3. Conflict Resolution:
Avoid assuming negative intent in misunderstandings.
Instead of immediately thinking someone acted with bad intentions, consider that they might have had genuine difficulties.
4. Daily Life Explanations:
If you hear a noise at night, don’t assume a burglar has entered. First, consider natural explanations like wind or an animal.
However, Sadhguru reminds us that this principle is not always absolute. In complex situations—like health issues or scientific research—understanding the full reality before making decisions is crucial.
Creativity and Mastery in Life
To sculpt a meaningful life, we must use nature’s gifts with skill and creativity. The power of imagination is essential. This creativity, according to Sadhguru, is developed through:
Study (learning from various sources)
Contemplation (deep thinking and analysis)
Guru’s Grace (the guidance and blessings of a realized master)
The Architect of Your Own Life
Ultimately, whatever needs to be done, it is we who must do it. Therefore, Sadhguru declares:
"You are the sculptor of your own life."
Conclusion
The art of life is in our hands. By cultivating wisdom, practicing simplicity, and making mindful decisions, we can shape our lives into a masterpiece.
Sadgurunath Maharaj Ki Jai!
Jayant Joshi
Jeevanvidya Mission
---
Comments