नादब्रह्म /
- ME Holistic Centre
- Mar 20
- 9 min read
*नादब्रह्म*
या विश्वाची उत्पत्ती ही नादापासून झाली आहे असे भारतीय संस्कृतीत मानण्यात येते. प्रथम नाद झाला तो ॐ चा. ॐ ला मूलभूत ध्वनी मानण्यात येते. म्हणूनच नादाला नादब्रह्म असे संबोधण्यात येते. वेद म्हणतात की *शब्दम* हा सर्व ऊर्जेचा सार आहे. ज्याला अनाहत नाद असेही म्हणतात. हा नाद ज्यावेळी घडला त्यावेळी एकमेकांवर आदळून नाद-ध्वनी निर्माण करणाऱ्या कोणत्याही दोन वस्तू अस्तित्वात नव्हत्या, अस्तित्वात होते ते केवळ आकाश. शब्दम चा अर्थ शब्द, ध्वनी, किंवा वाणी असा नसून शब्दमचा अर्थ आहे शाश्वत, दिव्य आणि अविनाशी. नाद हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. शब्दम हा शुद्ध ध्वनी आहे आणि तो कानांनी ऐकू येत नाही.
नाद हा अनाहत वा अहत असतो. अहत नाद म्हणजे भौतिक साधनांनी निर्माण होणारा ध्वनी. तर अनाहत नाद म्हणजे जो कुठल्याही प्रभावाने निर्माण होत नाही. अनाहत नाद म्हणजे भौतिक क्षेत्राच्या पलीकडील अस्तित्वात असलेली स्पंदने. जी कानांनी ऐकता येत नाहीत तर केवळ सखोल ध्यान आणि साधनेद्वारे अनुभवता येतात. ब्रम्हांडात आणि आपल्या शरीराच्या ठिकाणी हा अनाहत नाद अस्तित्वात आहे.
ज्यावेळी जीवन उर्जा म्हणजे प्राण कार्यरत होतो त्यावेळी शुद्ध चेतनेच्या प्रक्रियेतून शब्दाचे प्रगटीकरण होते. प्राणाद्वारे वायु स्वरयंत्रात ढकलला जातो आणि वाणीच्या रूपाने स्थुल स्वरूपात शब्द प्रगट होतो. या प्रकट होण्याच्या पूर्वीच्या आतील शब्दाला स्फोट म्हणतात आणि उच्चारित शब्दाला नाद किंवा ध्वनी म्हणतात. स्फोट हा कायमचा अपरिवर्तनीय घटक आहे, तर ध्वनी हा क्षणिक आहे, जो कानांनी ऐकू येतो.
शब्द हा वाणीच्या रूपात प्रगट होतो. या वाणीच्या रूपात प्रगट होण्याच्या पद्धतीचे आपल्या ऋषीमुनींनी काळजीपूर्वक विश्लेषण केले आहे. वाणी रूपात प्रगट होण्याच्या दरम्यान शब्द चार पातळ्यांवर प्रगट होतो, या चार पातळ्या म्हणजे परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी.
परा ही अलौकिक स्वयंप्रकाशी शुद्ध चेतना आहे. परा अवस्था ही कंपनाच्या स्वरूपात असते. या अवस्थेत विचार आणि शब्द हे दोन्ही एकच असतात आणि ते अव्यक्त असतात.
पश्यंती म्हणजे जे पाहते किंवा जे साक्षीदार आहे. ही वाणीची सर्वोत्तम पातळी आहे, जिथे शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही फरक नाही. पश्यंती हे सर्व विचार, वाणी आणि कृतींचे बीज आहे.
मध्यम हा सूक्ष्म किंवा प्राणीक जगात जाणवणारा ध्वनी आहे. मध्यम हे आपण उच्चार करण्यापूर्वी आपल्या मनात साठविलेले विचार आहेत. ते पश्यंती म्हणजे सूक्ष्म ध्वनी आणि वैखरी म्हणजेच स्थूल प्रगट ध्वनीच्या मध्ये स्थित आहेत. मध्यम अवस्था ही विचारांची निर्मिती म्हणजेच कल्पना, भावना आणि प्रतिमा आणि भौतिक पातळीवर कृती म्हणून अस्तित्वात असते.
वैखरी हा ध्वनीचा सर्वात खालचा प्रकार आहे. हा आपल्या घशातून बाहेर पडणारा उच्चारित शब्द आहे. बोलणाऱ्याने उच्चारलेले आणि श्रोत्याने ऐकलेले शब्द वैखरी म्हणून ओळखले जातात. वैखरी हा भौतिक आणि वाणीचा सर्वात बाह्य स्तर आहे.
शब्दब्रह्म ही विश्वाची आदिम- मुळ ध्वनी चेतना आहे. ही परमतत्वाची शक्ती आहे, जी ध्वनी आणि शब्दांच्या रूपाने प्रगट होते. ती भौतिक इंद्रिय आणि मनाद्वारे व्यक्त होते. ध्वनी आणि शब्द शाश्वत आहेत. एकदा उच्चारल्यानंतर ते विश्वाचा भाग बनून राहतात. यावरूनच आपल्याला आपली वाणी कशी असली पाहिजे हे कळते. आपल्या वाणीतून येणारी सकारात्मकता किंवा नकारात्मकता आपल्या श्वासा वाटे आवर्तीत किंवा परावर्तित होत असते जी जगातील घटनांना कारणीभूत असते. सूक्ष्माचे स्थुलांत रूपांतर होण्याचे हे रहस्य आहे. परा आणि पश्यंती हे सूक्ष्म ध्वनी म्हणजे अनाहत नाद आहेत तर मध्यम आणि वैखरी हे स्थूल म्हणजे अहत नाद आहेत. यावरून विचार आकार कसे घेतात ते आपल्या लक्षात येते.
प्रत्येक वस्तूच्या निर्मितीची प्रक्रिया प्रथम स्पंदनाने सुरू होते जी हळूहळू प्रगट होते म्हणजेच आकाराला येते आणि त्यानंतर अनुभवली जाते. भौतिक घटना या स्पंदनांचा परिणाम आहेत. एकापासूनच अनेकत्वाची निर्मिती होते परंतु तरीही ते आपले अंतरिक ऐक्य टिकवून ठेवते. या एकत्वाची जाणीव होणे म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख होणे.
*पाणीनी*
पाणीनी हे एक महान ऋषी होते. ते संस्कृत व्याकरणाचे जनक आहेत. ज्यावेळी पाणीनींना व्याकरणाची सूत्रे लिहावयाची होती तेव्हा ते अतिशय शांत चित्ताने ध्यानस्थ बसत असत. तेव्हा त्यांना ध्यानावस्थेत शिव डमरूच्या नादावर नृत्य करत असलेले दिसले. तुम्ही डमरू हे वाद्य बघितलेले आहे का? या डमरूचा नाद-ध्वनी ऐकलेला आहे का? डमरूचा नाद ध्वनी कसा असतो ते बघा. ऐ, ऊल, ऊल, रुक, ऐ, ऊई, ऄ, आऊच, हायवरट, लं, जपघण, कडदश, जपगडदश, कपचट, तौ, कपशै, शर, हल. यावरून आपल्या कोणालातरी काहीतरी बोध होतो कां? नक्कीच काही बोध होत नाही. परंतु... ...
पाणिनी लक्षपूर्वक डमरूचा नाद ऐकत होते आणि त्याचवेळी डमरूच्या नादातून त्यांना संस्कृत व्याकरणाची सूत्रे स्फुरली. पाणीनी हे महान संत होते. भारतीय संस्कृतीचा इतिहास आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे.
जेव्हा तुम्ही देखील अतिशय शांत चित्ताने ध्यानस्थ होता तेव्हा तुमचा ब्रह्मांडीतील गुढ नाद लहरींशी संपर्क येतो. पण तुमच्याकडे या ध्वनी लहरी ग्रहण करण्याकरता आवश्यक असलेले उपकरण नसल्याने तुम्ही या लहरींचे रूपांतर करू शकत नाही. या ब्रम्हांडात जो जो ध्वनी उत्पन्न झालेला आहे तो तो कायमस्वरूपी कोणत्या न कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे कारण शक्तीचा नाश होत नाही. हे ब्रम्हांडातील गुढ ध्वनीचे रूपांतर करण्याचे उपकरण साधनेने आणि गुरुकृपेने प्राप्त होते.
आधुनिक वैज्ञानिक हरमन यांनी असे सिद्ध केले आहे की आपल्या मेंदूचे चार भाग आहेत जे विचारांचे कार्य वेगवेगळ्या प्रकारे करतात.
मेंदूचा ए भाग Quadrant A - Analytical. म्हणजे हा भाग विश्लेषणात्मक म्हणजे तर्कसंगत आणि वस्तुस्थितीवर आधारित विचार करतो.
बी भाग Quadrant B - Practical. म्हणजे हा प्रत्यक्ष स्वरूपावर म्हणजेच सुनियोजित नियोजन, विस्तृत प्लॅनस- नकाशे आणि प्रक्रिया यांच्यावर आधारित विचार करतो.
सी भाग Quadrant C - Relational. म्हणजे हा भावनात्मक स्वरूपाचे विचार करतो.
तर डी भाग Quadrant D - Experiment. म्हणजे हा प्रयोगात्मक कल्पनाशक्ती अंर्तज्ञानात्मक विचार करतो ज्याला आपण प्रज्ञान म्हणजे intuition म्हणतो. प्रज्ञान हे मेंदूच्या डी भागाचे कार्य असते. नवनिर्मितीसाठी नवीन कल्पना, नवीन कौशल्य, नवीन शोध यासाठी मेंदूचा डी भाग कार्यरत असणे महत्त्वाचे असते. प्रज्ञान म्हणजे जे ज्ञान ब्रह्मांडातील ध्वनी पासून प्राप्त होते.
जेव्हा तुम्ही ध्यानावस्थेत असता तेव्हा तुमच्यातील प्रज्ञा जागृत होते. आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी दृष्टी प्राप्त होते Walt Disney ने उंदराला बघितले, ज्याला सगळेच बघतात पण केवळ वॉल्ट डिस्नेच्या मनात मिकी माऊसचा विचार आला. एखाद्यालाच कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचा विचार येतो. अनेक महत्त्वपूर्ण शोध हे प्रज्ञानाच्या शक्तीने अस्तित्वात आले आहेत. पाणीनी हा असा प्रज्ञावान संत होता ज्याला शंकराच्या डमरूच्या नादातून संस्कृत व्याकरण स्फुरले. ज्या व्याकरण सूत्रांची फोड पतंजलीने केली. पाणिनी आणि पतंजली यांचे मुळे आज संपूर्ण विश्वात वेगवेगळ्या भाषांचा उदय झालेला आहे आणि आजचे प्रगत युग आकाराला आले आहे.
आपण यापासून काय शिकले पाहिजे तर या सृष्टीत गुढ ध्वनी, नाद अस्तित्वात आहे आणि जर आपण पाणीनी सारखे अत्यंत शांत सरळ राहिलो तर आपण या ब्रह्मांडातील गुढध्वनी लहरींशी म्हणजे नाद ब्रह्माशी जोडले जाऊ. यासाठी आपले जीवन ध्यानात्मक झाले पाहिजे. ध्यानात्मक म्हणजे काय? तर आपण जीवनाविषयी आणि जीवनातील प्रत्येक अंगाविषयी अत्यंत जागरूक असलं पाहिजे, आणि आपले मन अत्यंत शांत आणि शीतल असले पाहिजे. तुम्ही कोणीही असा कोणत्याही प्रांतात कार्यरत असा पण ध्यान हे तुमचे बीज आणि मूळ असले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही शांत असलं पाहिजे. जीवनात कितीही प्रश्न असले तरी तुम्हाला अत्यंत शांत राहता आले पाहिजे. नादाची भाषा उलगडण्यासाठी शांत मन पाहिजे म्हणूनच संत कबीर म्हणतात,
इस घट अंतर अनहत गर्जेl इसी में उठत फुहारा ll
याचा अर्थ या शरीराचे ठिकाणी अनहत गर्जे म्हणजे शांतता आहे आणि जणू काही एखाद्या कारंजाप्रमाणे ही शांती उसळत आहे. यासाठी तुमचे मन अत्यंत शांत पाहिजे. कबीरजी म्हणतात,
दुर्दैवाने आपले मन शांत राहत नाही. म्हणून कबीरजी म्हणतात,
चलती चक्की देखकर दिया कबीरा रोये l
दुई पाटण के बीच मे शाबित रहा ना कोई ll
आपलं मन सतत चंचल असतं. मनात सतत विचारांची आवर्तने चालू असतात.
जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ब्रह्मांडातून अचानक कुठून तरी नाद लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे, समस्येचे समर्पक उत्तर मिळते. नवनवीन विचार येतात. नवनवीन कल्पना सुचतात.
आता आपले मन अत्यंत शांत ठेवून ब्रम्हांडातील नादब्रह्माशी जोडले जाऊन आपले जीवन कसे घडवायचे हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे. कारण सद्गुरु म्हणतात *"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"*
धन्यवाद.
सद्गुरु नाथ महाराज की जय
Jayant Joshi
Jeevanvidya Mission
Nāda Brahma
Indian culture believes that the universe originated from sound (Nāda). The first sound was Om (Aum), which is considered the fundamental vibration. Hence, sound is referred to as Nāda Brahma (the divine sound). The Vedas state that Shabd (sound) is the essence of all energy and is also called Anahata Nāda (unstruck sound). When this Nāda first emerged, there were no two objects colliding to create sound; only Ākāsha (space) existed.
The meaning of Shabd is not just a word, sound, or speech, but something eternal, divine, and indestructible. Nāda is the core of our existence. Shabd is a pure sound that cannot be heard by the ears.
There are two types of Nāda: Ahat (struck) Nāda and Anahata (unstruck) Nāda.
Ahat Nāda is the sound created by physical means.
Anahata Nāda is beyond the material realm and is not produced by any external force. It is a subtle vibration that exists both in the cosmos and within our bodies. This sound cannot be heard but can only be experienced through deep meditation and spiritual practice.
When Prana (life energy) becomes active, sound manifests through the process of pure consciousness. Prana pushes air through the vocal cords, and speech emerges as a gross form of sound. Before a word is spoken, an internal sound vibration occurs, called Sphota (burst of meaning), and the spoken word is called Nāda or Dhwani (sound). Sphota is an eternal and unchanging element, whereas spoken sound is momentary and audible.
The Four Levels of Speech
Ancient sages carefully analyzed how words manifest in speech. The word first emerges in four stages: Para, Pashyanti, Madhyama, and Vaikhari.
1. Para: This is the highest and purest form of consciousness, existing as pure vibration. In this state, thought and word are one and remain unmanifested.
2. Pashyanti: Meaning “that which sees,” this is the level where there is no distinction between the word and its meaning. It is the seed of all thoughts, speech, and actions.
3. Madhyama: This is the subtle sound that exists in the mental realm before being spoken. It lies between Pashyanti (subtle sound) and Vaikhari (gross sound). It represents the thought formation of words before they are uttered.
4. Vaikhari: This is the spoken sound that emerges from the throat and is heard by others. It is the grossest and most external form of speech.
Shabda Brahma – The Eternal Sound Consciousness
Sound is the primordial consciousness of the universe (Shabda Brahma). It is the energy of the ultimate reality (Parama Tattva), which manifests through sound and words. Once uttered, sound becomes a permanent part of the universe. This emphasizes the power of speech—our words carry vibrations that influence the world around us. Para and Pashyanti are subtle sounds (Anahata Nāda), while Madhyama and Vaikhari are gross sounds (Ahat Nāda). This explains how thoughts take shape and manifest in reality.
Every creation process begins with a vibration that gradually becomes manifest, acquires form, and is then experienced. Physical events are the outcome of these vibrations. From one emerges the many, yet the underlying unity remains intact. Realizing this unity is the key to self-awareness.
The Legend of Panini
Panini was a great sage and the father of Sanskrit grammar. When he wanted to compose the grammar rules, he meditated deeply in a state of utmost tranquility. During his meditation, he envisioned Lord Shiva dancing to the sound of his Damaru (a small drum).
Have you ever seen or heard the Damaru? Its rhythm sounds like:
"Ai, Ul, Ul, Ruk, Ai, Uī, A, Āuch, Hāivarta, Lam, Japghan, Kadadasha, Japgadadasha, Kapachat, Tau, Kapashai, Shar, Hal."
At first, this may not make sense. But Panini, in his deep meditation, could decode the sounds of the Damaru into the Sanskrit grammar rules. He was an enlightened saint who contributed significantly to Indian culture.
When one attains deep meditative stillness, they connect with the subtle cosmic vibrations. However, without the right internal faculties, these vibrations cannot be decoded into meaningful insights. All sounds that have ever been created in the universe continue to exist in some form, as energy is never destroyed. Through spiritual practice and the grace of a Guru, one can develop the ability to perceive these divine vibrations.
Scientific Perspective on Thought and Creativity
Modern scientist Hermann has classified the human brain into four quadrants, each responsible for different types of thinking:
1. Quadrant A (Analytical Thinking) – Logical and fact-based reasoning.
2. Quadrant B (Practical Thinking) – Structured and process-oriented planning.
3. Quadrant C (Relational Thinking) – Emotion-driven thoughts.
4. Quadrant D (Experimental Thinking) – Creative and intuitive thinking (Prajna or insight).
Prajna is the function of Quadrant D and plays a crucial role in innovation, creativity, and discoveries. It is the ability to receive knowledge directly from the cosmos.
In deep meditation, Prajna awakens, giving individuals a unique vision. Walt Disney saw a mouse—something everyone sees—but he imagined Mickey Mouse. Some people look at waste and see an opportunity for wealth. Great inventions and discoveries arise from this intuitive intelligence.
Panini was one such enlightened soul who received Sanskrit grammar through the sound of Lord Shiva’s Damaru. Later, Patanjali expanded on these grammatical rules. This foundation led to the development of languages worldwide, shaping modern civilization.
The Path to Cosmic Sound
The universe is filled with mysterious vibrations (Nāda). If we, like Panini, become deeply silent and focused, we can connect with Nāda Brahma—the cosmic sound. To achieve this, our life must be meditative.
What Does It Mean to Be Meditative?
Being fully aware of life and every aspect of existence.
Maintaining deep inner peace and tranquility.
Staying calm and centered, no matter what challenges arise.
Saint Kabir describes this state beautifully:
"Is ghat antar anahat garje, Isi mein uthta phuhara."
(Within this body, the unstruck sound resonates, like a fountain rising within.)
For this experience, the mind must be extremely still. But our restless minds are constantly churning with thoughts. Kabir further warns:
"Chalti chakki dekh kar, diya Kabira roye,
Do patan ke beech mein, sabit raha na koye."
(Seeing the grinding stones, Kabir weeps—nothing survives between the two grinding millstones.)
Our minds are caught in endless conflicts. When we attain stillness, cosmic vibrations reach us, providing insights, solutions, and innovative ideas.
Now, it is up to us to remain deeply still, connect with Nāda Brahma, and shape our own lives. As Sadhguru wisely says:
"You are the sculptor of your own destiny."
Thank you.
Sadhguru Nath Maharaj Ki Jai!
— Jayant Joshi, Jeevanvidya Mission
Comentários