सद्गुरु म्हणतात,
माणसाने उच्चाराचे ठिकाणी म्हणजेच नादाचे ठिकाणी सावध राहिले पाहिजे.
सावध तो सुखी.
या विश्वाचे मूळ नाद आहे. प्रथम ओंकाराचा नाद झाला आणि विश्वाची निर्मिती झाली.
नाद म्हणजे कंपन. ज्याला आपण इंग्रजीमध्ये Vibration असे म्हणतो. नाद हे सूक्ष्म शक्तीचे स्थुलातील रूपांतर आहे.
आपण यापूर्वी बघितलं की या विश्वात सर्वत्र नाद भरलेला आहे.
मराठीमध्ये श्रीरामांचे एक सुंदर भजन आहे.
नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद
निर्मितो मंगल धाम ... परब्रम्मात आहे राम... चैतन्यात आहे राम... सत्संगाचा सुगंध राम...
या गीतात विश्वात सर्व काही नादाचे रूपांतर कसे आहे याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे.
थोडक्यात विश्वात सर्वत्र चैतन्य म्हणजे शक्ती म्हणजेच व्हायब्रेशन्स आहेत.
असं म्हटलं जातं,
In this universe, everything is vibration. There is nothing other than vibration.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, चैतन्य असे सर्वगत.
हे चैतन्य वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट होत असते. आपण जे काही करतो त्या सर्वांमध्ये आपण चैतन्याचे चैतन्याच्या दुसऱ्या स्वरूपात प्रगटीकरण करत असतो. चैतन्य हे सूक्ष्म आहे आणि या सूक्ष्माचे स्थुलात आणि स्थुलाचे रूपांतर सूक्ष्मात असे चक्र सतत चालू असते.
यामुळेच नादाचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो.
या तत्त्वाचा भारतीय ऋषीमुनींनी संशोधन करून मंत्रांची रचना केलेली आहे. आणि यातूनच संगीताचा देखील उगम झालेला आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
*मन करा रे प्रसन्न,*
*सर्व सिद्धीचे कारण*
सध्याच्या धकाधकीच्या, ताण तणावाच्या वातावरणात मनाला प्रसन्न करणारे माध्यम म्हणजे संगीत. स्वर, गीत आणि ताल यांचा आपल्या मनावर आणि शरीरावर देखील परिणाम होत असतो.
पंडित शशांक कट्टी हे गेली 24 वर्षे संगीत साधना, संगीत तपश्चर्या करत आहेत. त्यांनी सुरसंजीवन ही मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचार करणारी उपचार पद्धती सुरू केलेली आहे. डोकेदुखी, त्वचा विकार याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, अस्थमा यासारख्या रोगांवर ते
संगीताच्या माध्यमातून प्रभावी उपचार करत आहेत. कफ, वात, पित्त या त्रिदोषांवरच्या असमतोलावर पंडित शशांक कट्टी आपल्या सुर संजीवनी माध्यमातून विशेष परिणामकारक उपचार करत आहेत.
संगीत हे शास्त्र आहे. संगीत ही कला आहे.
भर्तृहरी विरचित नितीशतकम यात असं म्हटलं आहे की,
साहित्य संगीत कलाविहीना:
साक्षात पशु:
म्हणजे साहित्य संगीत आणि कलाविहीन मनुष्य हा पशु समान आहे.
संगीताचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करून आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखू शकतो. आपल्या सर्व नर्व्हस मध्ये वेगास नर्व्ह नावाची नर्व्ह ही सर्वात महत्त्वाची नर्व्ह आहे. या वेगास नर्व्ह च्या कार्यक्षमतेवर आपल्या इंद्रियांचे आरोग्य ठरते. आणि या नर्व्हला संगीताच्या माध्यमातून कार्यक्षम करता येते.
*संगीताच्या माध्यमातून आपल्या जिभेवरील टेस्ट बडसना म्हणजेच चवींना अधिक कार्यक्षम करून आपल्या आहाराचा मनमुराद आस्वाद घ्या.आणि आपले आरोग्य सुदृढ राखा.*
आपण कधीतरी आपल्या सभोवतालचे जग जे आता जितके चैतन्यमय आहे त्यापेक्षा अधिक चैतन्यमय करण्याचा विचार केला आहे का?
आपण 1960 च्या दशकातील भारताच्या एका छोट्या प्रयोगशाळेत डोकावून बघू.
अण्णामलाई विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर टी.सी. सिंग यांना वनस्पतींच्या अंतर्गत जीवनाबाबत नेहमीच आकर्षण होते. एक दिवस ते आपल्या लाडक्या एका वनस्पतीकडे बघत असताना त्यांच्या मनात एक विचारा आला.
वनस्पती संगीताला प्रतिसाद देतील का? आणि कसा प्रतिसाद देतील?
या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी प्रयोग करायचे ठरविले.त्यांनी दोन
ग्रीनहाऊस उभारले. दोन्ही एक समानच होते. पण दोन्हीमध्ये एकच फरक केला होता, तो म्हणजे त्यांनी एका हरितगृहात सौम्य आवाजातील संगीताची योजना केली तर दुसरे हरितगृह हे सामान्य होते. त्यांनी संगीत हरितगृहात दिवसातले अनेक तास भारतीय शास्त्रीय संगीत चालू ठेवले. हा प्रयोग अनेक महिने चालला. या काळात सिंग यांनी आपली निरीक्षणे बारकाईने नोंदवली.
त्यानंतर जे घडले त्याने केवळ सिंगच नाही तर संपूर्ण वैज्ञानिक समुदाय आश्चर्यचकित झाला. संगीताच्या सांन्नीध्यातील वनस्पती दुसऱ्या सामान्य वनस्पतींपेक्षा 20% उंच वाढल्या आणि एवढेच नाही तर त्यांना ७२ टक्के जास्त पाने आली होती. आणखी काही प्रयोगात असे दिसून आले की सौम्य, सामंजस्यपूर्ण आवाजातील संगीतात न्हाऊन निघालेल्या वनस्पतींची जास्त भरभराट झाली आहे. या प्रयोगाच्या निष्कर्षाने प्रेरित होऊन जगभरातील शास्त्रज्ञांनी ध्वनी आणि सजीव यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होईल की, याचा आणि माझ्या आहारातील चवीचा काय संबंध आहे?
तर जसा त्या वनस्पतींनी संगीताच्या सूक्ष्म प्रभावाला प्रतिसाद दिला तसाच योग्य संगीत श्रवण वातावरणाने आपल्या इंद्रियांना जागृत करून त्यांची कार्यक्षमता वाढविता येऊ शकते.
आपण बहुतेक जण आपल्या अन्नाचा खराखुरा अनुभव न घेताच खात असतो.
आपल्या आहार पद्धतीत जेवणापूर्वी श्लोक म्हणायची पद्धत होती...
वदनी कवल घेता,
नाम घ्या श्रीहरीचे.
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा
अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे
जाणिजे यज्ञ कर्म.
या श्लोकात जे काही सांगितलेले आहे त्याचा वैज्ञानिक दृष्टीने खरोखरच प्रत्यय येतो.
आपले जेवण हे केवळ वायफळ कर्म न होता ती अन्नेश्वरी देवीची उपासना झाली पाहिजे.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात, शांतपणे जेवणे हे देखील दुरापस्त झालेले आहे. आणि जरी वेळ असेल तरी आम्ही फोन पाहत किंवा टीव्ही सिरीयल बघत किंवा कामाच्या व्यापाचा विचार करत जेवण करत असतो.
परिणाम काय होतो?
तर ...
आपण एका समृद्ध वैविध्यपूर्ण अनुभवाला गमावतो. आपण आपले अन्न नीट चावत व चघळत नाही. अशा विचलित अवस्थेमुळे खाल्लेल्या अन्नासाठी आवश्यक असलेले पाचक रस एंजाइम्स पुरेशा प्रमाणात तयार न झाल्याने अन्नाचे नीट पचन होत नाही आणि त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले व्हीटामिन्स, खनिजे मिळत नाहीत आणि पचनाच्या आणि वजन वाढीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
पण जर आपण डॉक्टर सिंग यांच्या प्रयोगाप्रमाणे जेवताना आपल्या संवेदनांच्या अनुभवांची जोपासना करणारे आणि वृद्धी करणारे वातावरण निर्माण करू शकलो तर?
ऑस्ट्रेलियातील फ्रीलेंडर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका मनोरंजक प्रयोगात असे दिसून आले की,
कोलाहल युक्त, अशांत वातावरणात जेवण केल्याने आपली भूक तर कमी होतेच पण आपला स्वभाव देखील चिडचिडा होतो. शिवाय संशोधकांना असेही आढळले की सौम्य उत्तेजित सुखदायक संगीताच्या वातावरणात अन्न ग्रहण केल्यास आपला जेवणाचा आनंद तर वाढतोच पण अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील उत्तम राहते.
या दोन्ही वैज्ञानिक संशोधनांचा आणि वैयक्तिक अनुभवाचा विचार केल्यास यावरून एकच स्पष्ट निष्कर्ष निघतो की सजगपणे अन्नग्रहण करण्यासाठी सौम्य संगीताचा वापर करणे फायदेशीर आहे.
हे खरोखर खूप सोपे आहे नाही का ? हा उपाय आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहे.
हे कसं करायचं?
तर
संथ गतीचे वाद्य संगीताची निवड करा. संथ शास्त्रीय संगीत किंवा निसर्ग ध्वनीचा वापर करा. सुखद, आनंदी वातावरण निर्मितीसाठी जेवणापूर्वी काही दीर्घ श्वास घ्या. आणि थोडा वेळ संगीतावर मन एकाग्र करा. संगीतामुळे अन्नाची चव आणि अन्नाचा पोत याची समज कशी वाढते याकडे लक्ष द्या.
यामुळे जाणीवपूर्वक, सजगतेने जेवणासाठी पार्श्वभूमी तयार होईल.
यामुळे तुम्ही सावकाश अन्नग्रहण कराल. प्रत्येक घासाच्या चवीचा आस्वाद घ्याल. आणि कमी अन्नाने देखील भूक भागेल.
याने केवळ आपला जेवणाचा आनंदच फक्त द्विगुणीत होणार नाही तर पचन चांगले होईल आणि एकूणच आरोग्य चांगले राहील.
*आपण काय खातो यापेक्षा देखील आपण कसे खातो हे जास्त महत्त्वाचे आहे*
खऱ्या अर्थाने समाधानी आणि निरोगी राहण्याचे रहस्य केवळ आपल्या ताटातील पदार्थांवर नाही तर आपण जेवताना भोवताली जे वातावरण असते त्यावर अवलंबून असते. मग या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की नाही?
जेव्हा आपण महागड्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो तेव्हा तिथे केवळ अन्नावर लक्ष केंद्रित केलेले नसते तर काळजीपूर्वक वातावरण निर्मिती केलेली असते. प्रकाश योजना, सजावट आणि होय पार्श्वसंगीत. कारण ते जाणतात की अन्नाची चव ही केवळ जिभे पूरती मर्यादित नसते तर ही चव ही आपल्या समग्र इंद्रियांच्या परस्पर गुंतागुंतीच्या संबंधातून निर्माण होते.
सुखद संगीतामुळे आपल्या जीवनात केवळ एक सुखद भावना निर्माण होत नाही तर आपण एक प्रक्रिया सुरू करत असतो जी आपल्या मेंदूला सूचना देते की आता सावकाश, लक्ष देऊन अन्नाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. यामुळे आपणास केवळ आनंद मिळतो असे नाही तर आपल्या संवेदनांचा विस्तार होतो.
यामुळे आपण यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या चवीचा आस्वाद घेऊ. मग चला तर,
आज आपण एक संकल्प करूया.
कमीत कमी दिवसातील एक जेवण तरी आपण संगीतमय वातावरणात करूयात.
कोणीही जेवताना फोन वापरायचा नाही, टीव्ही बघायचा नाही फक्त सावकाश जेवण आणि हळुवार संगीताचे अल्हाददायक सूर.
थोड्याच दिवसात आपल्याला आपला जेवणाचा अनुभव बदलल्याचे तर लक्षात येईलच पण आपल्या असेही लक्षात येईल की या छोट्याशा बदलामुळे आपल्या जीवनाच्या इतर क्षेत्रात आपण जास्त सजग आणि जास्त जागरूक झालो आहोत.
नामधारकांना अशी सूचना करावीशी वाटते की, संगीताची निवड करताना फार विचार करू नका. सद्गुरूंच्या आवाजातील विश्वप्रार्थना हळुवार आवाजात लावा. प्रार्थना सौम्य आवाजात दिवसभर घरात गुंजू द्या. प्रार्थनेने घराचे वातावरण निनादू द्या.
प्रार्थनेचा सततचा नाद हा आपला नाद निश्चितच जागेवर ठेवेल.
धन्यवाद.
*सद्गुरु नाथ महाराज*
*की जय*
जयंत जोशी
जीवन विद्या मिशन
Nād (Bibration)
Sadhguru says that one should be cautious about the place of expression—that is, the place of sound. One who is cautious is happy.
The origin of this universe is sound. First, the sound of Om was produced, and then the universe was created.
Sound is a “vibration”. Sound is the transformation of subtle energy into its gross form. We have seen earlier that the entire universe is filled with sound.
There is a beautiful Marathi hymn dedicated to Lord Shri Ram:
“From sound arises this sound: Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram; sound creates a divine abode… Ram is the Supreme Divine… Ram resides in consciousness… the fragrance of true companionship is Ram.”
This song beautifully describes how everything in the universe is a manifestation of sound. In short, all consciousness—or energy—in the universe is nothing but vibrations. It is said, “In this universe, everything is vibration. There is nothing other than vibration.” Saint Dnyaneshwar explains that consciousness is all-pervading. This consciousness manifests in various forms; in everything we do, we are expressing one form of consciousness through another. Consciousness is subtle, and there is a continuous cycle in which the subtle transforms into the gross and vice versa. This is why sound affects our mind and body.
Indian sages, through their research, composed mantras based on this principle, and from this, music also originated. World Guru Saint Tukaram Maharaj says, “Make your mind joyful; it is the cause of all accomplishments.”
In today’s fast-paced and stressful environment, music serves as a medium to uplift the mind. The tone, song, and rhythm have an impact on both our mind and body. For the past 24 years, Pandit Shashank Katti has been practicing and researching music. He has introduced a treatment method called Sur Sanjeevani, which uses music to treat mental and physical ailments. He is effectively treating conditions such as headaches, skin disorders, diabetes, high blood pressure, and asthma through music. Pandit Shashank Katti’s Sur Sanjeevani method also produces especially effective results in balancing the three doshas—Kapha, Vata, and Pitta.
Music is both a science and an art. In the Nitiśataka composed by Bhartrihari it is said:
“Man without literature, music, and art is like an animal.”
In other words, a person devoid of literature, music, and art is comparable to an animal.
By incorporating music into our daily lives, we can maintain our physical and mental health. Among all our nerves, the vagus nerve is the most important; the health of our senses depends on the efficient functioning of this nerve, and music can help optimize its performance.
Through music, by enhancing the function of the taste buds on your tongue, you can truly savor your food and maintain robust health.
Have you ever considered making the world around you even more vibrant and full of life than it already is?
Let us look back to a small laboratory in India during the 1960s. Dr. T.C. Sing, a botanist at Annamalai University, was always fascinated by the inner life of plants. One day, while observing one of his favorite plants, he wondered: Will plants respond to music? And if so, how will they respond? Inspired by this idea, he decided to conduct an experiment. He built two greenhouses that were identical in every way except for one difference: in one greenhouse, he played soft music, while the other remained as usual. He played Indian classical music for many hours each day in the musical greenhouse, and the experiment lasted for several months. During this period, Dr. Sing meticulously recorded his observations.
What happened next astonished not only Dr. Sing but the entire scientific community. The plants exposed to the musical environment grew 20% taller than those in the normal greenhouse and produced 72% more leaves. Further experiments showed that plants bathed in soft, harmonious music exhibited significantly more flourishing. The results of this experiment inspired scientists around the world to explore the complex relationship between sound and living organisms.
You might now naturally wonder, what does this have to do with the taste of our food? Just as plants respond to the subtle influence of music, a properly curated musical environment can awaken our senses and enhance their functioning. Most of us do not truly experience our food.
In traditional dining, before a meal, a shloka was recited:
While taking the offering in your hand,
Chant the name of Shri Hari.
As you take the name, life is enlivened;
May life be sustained.
Food is the complete Brahman;
It does not merely fill the stomach.
Understand the sacrifice and the work.
The scientific truth of these words becomes evident when examined closely.
Our meal should not be a mere mechanical act; it should be an act of worship to the goddess of food. In today’s hectic life, even eating calmly has become rare. Even when time permits, we are distracted by phones, television serials, or thoughts about work while eating. What is the result? We lose a rich, varied experience. We do not chew our food properly, and because of this distracted state, the digestive enzymes required for proper digestion are not produced in sufficient quantities. Consequently, the body does not receive the necessary vitamins and minerals, leading to problems with digestion and weight gain.
But what if, like in Dr. Sing’s experiment, we create an environment that nurtures and enhances our sensory experience while eating? An interesting experiment conducted by scientists at Flinders University in Australia revealed that eating in a noisy, chaotic environment not only decreases your appetite but also makes you irritable. Moreover, researchers found that when you eat in a soothing and pleasant musical environment, not only does the enjoyment of your meal increase, but digestion also improves, and both mental and physical health are better maintained.
Considering these scientific studies and personal experiences, one clear conclusion emerges: using gentle music during meals is beneficial for mindful dining.
It really is that simple, isn’t it? This method is extremely effective for health. How can it be done? Choose slow-paced instrumental music—opt for slow classical music or natural sounds. To create a pleasant and joyful environment, take a few deep breaths before you eat, and spend a little time focusing your mind on the music. Observe how the taste and texture of your food become more appreciable. This practice will create a mindful, attentive atmosphere for your meal. You will eat slowly, savor every bite, and even a small amount of food will be satisfying. This approach not only doubles the enjoyment of your meal but also improves digestion and overall health. In essence, it is not just what you eat, but how you eat that matters.
The secret to living a contented and healthy life depends not only on the food on your plate but also on the environment in which you eat. Shouldn’t we take this into account?
When you dine in an upscale restaurant, the focus is not solely on the food; the ambience is carefully crafted through lighting, decor, and, indeed, background music. They understand that the flavor of food is not confined to the tongue alone; it is created by the complex interplay of all our senses.
Pleasant music does more than create a joyful emotion; it initiates a process that signals your brain that it is time to eat slowly and attentively. This not only brings pleasure but also expands your sensory experience, allowing you to savor flavors you have never experienced before. So, let us make a resolution today: at least one meal a day should be enjoyed in a musical environment. No one should use their phone or watch television while eating; simply enjoy a slow meal accompanied by the soothing strains of gentle music.
In just a few days, you will notice a change in your dining experience, and you will realize that this small change can make you more mindful and aware in other areas of your life as well.
I would advise devotees not to overthink the choice of music. Play the universal prayer in Sadhguru’s voice in a gentle tone. Let the prayer resonate softly throughout your home throughout the day. Allow prayer to fill the atmosphere with sound. The continuous vibration of prayer will certainly keep your own vibration elevated.
Thank you.
Sadhguru Nath Maharaj
ki Jai
Jayant Joshi
Jeevan Vidya Mission
Comments