top of page

*भक्ती म्हणजे काय? खरा भक्त कोण?* / What is Devotion? Who is a True Devotee?


यापूर्वी आपण थांबायचे कुठे या लेखमालेतील पहिला लेख वाचलेला असेलच. त्यातीलच आज आपण हरिपाठातील ४ थ्या अभंगातील पहिल्या ओळीचा शब्दार्थ, भावार्थ आणि गुह्यार्थ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.


*भावेविण भक्ती*

*भक्तिविण मुक्ती*

*बळेविण शक्ती*

*बोलू नये*


शब्दार्थ: भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी उपासना नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे.


येथे भक्ती म्हणजे काय ते प्रथम समजून घेतले पाहिजे. ज्या कोणत्याही व्यक्ती विषयी, देवते विषयी, गोष्टीविषयी, कोणत्याही कर्माविषयी, आपली नितांत श्रद्धा आणि त्यावर प्रेम असते ती श्रद्धा आणि ते प्रेम म्हणजेच भक्ती होय. भाव म्हणजे काय तर निरातिशिय निरपेक्ष निस्सिम प्रेम म्हणजे भाव. येथे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे प्रेम... प्रेम... म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या नाही. प्रेमाला शब्दात पकडता येत नाही. प्रेमाची व्याख्या करण्याचे काही प्रयत्न झाले आहेत त्यातील एक म्हणजे:

"सर्वथा ध्वंस रहीतम सर्व त ध्वंस कारणे

यत भावबंधनम योनो तत प्रेमा कीर्तिता"

यात भावबंधनम हेच येथे सांगायचे आहे.


भाव म्हणजे प्रेम. प्रेमाची व्याख्या काय? तर प्रेम म्हणजे उद्ध्वस्त होण्याची सगळी कारणे निर्माण झालेली असताना देखील जे उध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात.

भाव म्हणजेच प्रेम. कोणतेही कर्म करण्याच्या मागे जर प्रेम नसेल तर ते कर्म हे यांत्रिक कर्म होईल. कर्म साधना करताना आमच्या अंत:करणांमध्ये प्रेम नसेल तर ती कर्म साधना पूर्णत्वाला जाणार नाही. उलट ती साधना हाच प्रतिबंध ठरेल. कारण काय तर त्या प्रेम विरहित साधनेतून आमच्याकडून योग्य कर्म होणार नाही, आणि आम्ही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही.

असे कर्म म्हणजे केवळ उपाधी होईल. जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *वायाची उपाधी दंभ धर्म.*

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भाव हा जास्त महत्त्वाचा. भक्तीमध्ये, ज्ञाना मध्ये, कर्मा मध्ये भाव पाहिजे. गुरु विषयी भाव नसेल तर ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कर्मामध्ये भाव असल्याशिवाय कर्माचे फळ मिळणार नाही. योगामध्ये भाव असल्याशिवाय योगाचे फळ मिळणार नाही.


प्रेम हे बोलून दाखवता येत नाही. पण प्रेम बोलल्याशिवाय देखील राहत नाही. काही ना काही तरी शब्द बाहेर काढतच. शब्दांनी प्रेम व्यक्त होत नाही, ही गोष्ट खरी आहे. अंत:करणांमध्ये प्रेम हे शांत ज्योती सारखं तेवत असत. ते प्रेम बोलून दाखवण्या करता आम्ही तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि प्रेमाची ज्योत थरथरते किंवा विझून तरी जाते. याच्या करता खरं प्रेम जिथे आहे तिथे तोंड उघडायचं नाही, आणि जिथे तोंड उघडून दाखवलं जातं ते प्रेम खरं नसतं. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे हे कधीच खरं नसतं. खोटी गोष्ट आहे. अरे न बोलता व्यक्त होत त्यालाच प्रेम म्हणतात. प्रेम हे शब्दाने नाही तर वर्तणुकीतून व्यक्त झाले पाहिजे.


थोडक्यात आमच्या वाट्याला जे काम आल असेल, मग ते कुटुंबातील वैयक्तिक जबाबदारीचे काम असो किंवा कार्यालयीन अथवा सामाजिक काम असो, ते काम आम्ही प्रेमाने करावयास हवे. भक्ती भावाने करावयास हवे.


मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे अंतिम ध्येयाची प्राप्ती. कोणतेही कर्म करत असताना काय असते आमचे ध्येय? तर आमचे ध्येय असते आनंदाची प्राप्ती. जेव्हा आम्ही भक्तिभावाने, प्रेमपूर्वक कोणतेही कार्य करतो तेव्हा त्या कामाच्या पूर्ततेतून आम्हाला परमानंद प्राप्त होतो.हीच मुक्ती. म्हणूनच सद्गुरु म्हणतात,

*काम करा हो, काम*

*करा कामावरती प्रेम*

*करा.*

*प्रत्येक कृती ही*

*राष्ट्रहिताची*

*विश्वशांतीची* या एका अमृत वचनात महान अर्थ दडलेला आहे. आमचे प्रत्येक कार्य आणि ते कार्य पार पाडत असताना आमच्याकडून होणारी प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रेमातून आणि विश्वशांतीच्या संकल्पनेतूनच व्हायला हवी.


खरा भक्त तोच जो निरपेक्ष पणे कार्य करतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात,

*कर्मण्येवाधिकारस्ते*

*मा फलेषु कदाचन*

या भगवद्गीतेतील वचनाचा आजपर्यंत विपरीत अर्थ घेतला आहे की तू कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको. वास्तविक पाहता या वचनाचा योग्य अर्थ असा आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे आणि या कर्म करण्याच्या अधिकारातच तुला प्राप्त होणारे फल हे निहीत आहे. तुझे कर्म ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारचे असेल त्या प्रमाणात तुला फळ मिळणारच आहे. एकदा कर्म झाले की त्याचे फळ निश्चितच मिळणार हा कर्म सिद्धांत आहे. म्हणून तु कर्मफळावर लक्ष ठेवून कर्म करू नको. याचे उदाहरण द्यायचे झाले तर आजकाल कोणतीही वस्तु निर्माण होताना तिला अनेक प्रोसेस मधून जावे लागते आणि सगळ्या प्रोसेस एकच व्यक्ती करत नाही तर प्रत्येक प्रोसेस ही वेगवेगळ्या व्यक्तीकडून होते. या सर्व व्यक्ती मिळून वस्तू निर्माण झाल्यामुळे त्या वस्तूच्या मोबदल्यात प्रत्येकाचा वाटा हा त्याच्या कामाच्या आणि कौशल्याच्या प्रमाणात ठरलेला असतो.


*आज आपण भक्ती*

*म्हणजे काय? आणि*

*खरा भक्त कोण ते*

*पाहू*...


भक्ती म्हणजे निष्ठा. भक्ती म्हणजे समर्पण. भक्ती म्हणजे सेवा. भक्ती म्हणजे श्रद्धा. भक्ती म्हणजे ज्ञान. योग म्हणजे युज. म्हणजे जोडले जाणे सामील होणे. देव म्हणजे काय? तर देव म्हणजे राम, कृष्ण, बुद्ध किंवा अल्लाह नाही तर देव म्हणजे *समष्टी*. म्हणजेच संपूर्ण जग. *हे विश्वचि माझे घर* संपूर्ण जग हेच परमेश्वर आहे. या संपूर्णतेवर निष्ठा, श्रद्धा, या संपूर्ण जगताचे ज्ञान, आणि या संपूर्णते प्रति आत्मसमर्पण म्हणजे भक्ती होय.


भक्ती योग म्हणजे आपले जीवन भक्तीमय करणे. जीवन भक्तीमय करणे म्हणजे आपल्या जीवनात समग्रता आणणे होय. समग्रता म्हणजे काय? तर समग्रता म्हणजे कोणत्याही संकल्पनेचा किंवा कोणत्याही प्रणालीचा सर्व समावेशक दृष्टिकोन.‌ म्हणजे त्या संकल्पनेतील प्रत्येक घटकाचा फक्त वैयक्तिक रित्या विचार न करता सर्व घटकांचा वैयक्तिक आणि संयुक्तरित्या एकत्रित विचार करणे. भक्तीत समग्रता आणणे म्हणजे भक्तीतील भाव, सेवा, श्रद्धा, ज्ञान आणि आत्मसमर्पण यांचा एकत्रित विचार करणे. म्हणजेच भक्तीत केवळ भाव असून उपयोगाचे नाही तर श्रद्धा देखील असली पाहिजे, भक्ती ज्ञान पूर्वक झाली पाहिजे, निरपेक्ष सेवा करता आली पाहिजे आणि आत्मसमर्पण म्हणजे मी पणाचा लोप झाला पाहिजे. ज्यावेळी अशा रीतीने आपण भक्ती करू तेव्हाच खऱ्या अर्थाने भक्ती होईल. अन्यथा भक्ती म्हणजे कृत्रिम म्हणजे यांत्रिक कृती होईल.


तामिळ संत तिरूकुरल म्हणतात, "जसे तुमची वर्णमाला ही अ पासून सुरू होते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक कृतीची सुरुवात ही भगवंतापासून करा." भगवंत म्हणजे काय? तर भगवंत म्हणजे परिपूर्णता. म्हणजेच तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात परिपूर्णता आणा. परिपूर्णतेने कृती करणे हा भक्तीचा सर्वोत्तम प्रकार आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कार्यात समग्रता आणून कार्य. करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कार्यात परमानंदाची, पवित्रतेची प्राप्ती होईल. तुमच्या जीवनातील मी पणा लोप पावेल आणि तुम्ही अधिकाधिक संवेदनशील व्हाल.


या कथेचा विचार करा.

एक फारसा साक्षर नसलेला तरूण रोज आपल्या शेतात कामासाठी जात असे. काम सुरू करण्यापूर्वी तो रोज नित्य नियमाने ईश्वराची प्रार्थना करत असे. तो आपल्याबरोबर प्रार्थनेचे पुस्तक घेऊन जात असे, आणि त्या पुस्तकातून वाचून प्रार्थना करत असे. एक दिवस तो आपले प्रार्थनेचे पुस्तक घ्यायचे विसरतो. शेतावर आल्यावर प्रार्थनेचे वेळी त्याच्या लक्षात येते आपण पुस्तक विसरलो आहोत. तो परमेश्वराला म्हणतो, देवा मी आज पुस्तक आणले नाही, आणि मला प्रार्थना तोंडपाठ नाही. पण मला वर्णलिपी अ ते ज्ञ पाठ आहे. मी ती वर्ण लिपी म्हणतो. नाहीतरी प्रार्थना या वर्ण लिपीतील अक्षरांपासूनच बनलेली आहे नां? तू तुला पाहिजे तशी वर्ण लिपीतील अक्षरांची जुळवाजुळव करून घे आणि माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. तुझ्या प्रतीच्या निष्ठेने, श्रद्धेने मी माझे काम करत राहीन तेच माझे, तुझे पूजन समज. परमेश्वर म्हणतो, बाळा आज पर्यंत जगात ज्या ज्या प्रार्थना केल्या गेल्यात त्यातील ही सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे. आणि माझ्या स्मरणात केलेले प्रत्येक कर्म हेच खऱ्या अर्थाने माझे पूजन आहे. हा तुझा माझ्या प्रति असलेला विश्वास हीच माझी भक्ती आहे. *तथास्तु*


भक्ती म्हणजे काही एक विशिष्ट साधना नाही. साधना म्हणजे काय? तर, *साधना भावे साध्य भाव:* साधना म्हणजे अभ्यास, प्रयत्न, आणि तपश्चर्या केल्याने साध्य म्हणजे लक्ष, उद्दिष्ट ज्याला आपण आजकाल GOAL म्हणतो ते प्राप्त होते. योग्य दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे इच्छित फळ मिळते. योग्य दिशेने पुरेसे प्रयत्न केल्याशिवाय आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे भक्ती ही काही केवळ एक विशिष्ट साधना नसून भक्ति म्हणजे अनेक साधनांचा समूह आहे. आणि भक्तीचे अंतिम ध्येय हे ईप्सीत फळ प्राप्त करणे आहे. ढोबळमानाने भक्तीचे तीन रूपे सांगता येतील. ते म्हणजे कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञानयोग.


कर्मयोग म्हणजे माझ्या वाट्याला आलेले काम करणे ही देखील भक्तीच आहे. हे कर्म योग्य रीतीने करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करणे म्हणजे उपासना होय. ही उपासना म्हणजेच भक्ती होय. तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करून घेऊन ज्ञान पूर्वक कर्म करणे म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती होय.


कर्मयोग-कर्म करणे म्हणजेच भक्ती. कारण आम्ही कर्म करतो म्हणजे काय करतो तर आम्ही समग्रतेच्या विचारातून कर्म जेव्हा करतो तेव्हा ते ईश्वरार्पण कर्म होते. ज्यामुळे मी पणाची भावना, मी कर्म केले ही भावना नाहीशी होते. आणि त्या कर्मातून जे काही फळ प्राप्त होते ते देखील मी समग्रतेला म्हणजेच ईश्वराला अर्पण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने जे प्राप्त झाले आहे त्याचा आम्ही प्रसाद बुद्धीने स्वीकार करतो. अशा रीतीने केलेले कर्म ही भक्ती होय आणि हा खरा कर्मयोग होय.


उपासना हा देखील भक्तीचाच एक प्रकार आहे. या उपासना प्रकारातील भक्तीत कृतज्ञतेचा भाग हा महत्त्वाचा भाग आहे. मी केलेल्या भक्ती अंती मला जे फळ प्राप्त झालेले आहे ते केवळ माझ्या एकट्याच्या सामर्थ्याने नाही तर अनेक ज्ञात अज्ञात शक्तींच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने मला फळ प्राप्त झालेले आहे याची जाणीव असणे म्हणजे कृतज्ञता होय.


कर्माचे दोन प्रकार आहेत १.सकाम कर्म आणि

२.निष्काम कर्म.

सकाम कर्म म्हणजे तुम्ही कोणत्यातरी इच्छां पुर्तीसाठी कर्म भक्ती करत आहात आणि निष्काम कर्म म्हणजे तुम्ही कोणत्याही इच्छेविना कर्म करत आहात.

ज्ञानपूर्वक भक्ती म्हणजे ज्ञानपूर्वक कर्म. म्हणजे काय तर कर्माचे म्हणजेच ईश्वराचे निर्गुण निराकार स्वरूप समजून घेऊन कर्म करणे.


अशा प्रकारच्या कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञान योगाचे आणखी स्तर होतात ते म्हणजे कर्मयोग लक्षण, उपासनायोग लक्षण, आणि ज्ञानयोग लक्षण. लक्षण म्हणजे स्वरूप. आत्ता या क्षणी तुम्ही हा लेख वाचत आहात पण जर या वाचनात तुमचे संपूर्ण लक्ष नसेल तर ज्ञान होणार नाही. भक्ती नसेल तर तुम्ही जे काही वाचत आहात त्याचे स्वरूप हे केवळ माहिती प्राप्त होणे असे होईल आणि त्याने कोणतेही परिवर्तन घडून येणार नाही. हे श्रवणाचे स्वरूप.


कर्मयोगाचा स्तर एक आणि स्तर दोन यात फरक काय आहे? कर्मयोग स्तर एक म्हणजे भौतिकवादी व्यक्ती, जी आपल्या स्वार्थ वैध आणि धार्मिक मार्गाने पूर्ण करते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे, त्याला कंपनीचा C.E.O. व्हायचे आहे, अशी व्यक्ती म्हणजे भौतिकवादी, संसारी व्यक्ती. जी स्वार्थी आहे पण ती आपला स्वार्थ वैध आणि धार्मिक म्हणजे कायदेशीर मार्गाने साधत आहे, सामान्यतः आपण सर्वजण याच प्रकारात मोडतो. ज्यांना आपण सकाम कर्मयोगी म्हणतो. यामध्ये कर्मयोग हा स्वतःच्या म्हणजेच मी पणाच्या भावनेतून होतो हे माझे यश आहे असे मी मानतो. हा झाला कर्मयोगाचा भक्तीचा पहिला स्तर. कर्मयोगाचा दुसरा स्तर म्हणजे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होता. तुम्हाला तुमच्या कामाचे इच्छित फळ मिळते पण या फळाचा आस्वाद घेण्यापूर्वी तुम्ही असे मानता की हे समग्रतेचे म्हणजेच ईश्वराचा प्रसाद आहे आणि तुमच्या मनात समग्रते विषयी कृतज्ञता भाव जागृत होतो आणि मिळालेले यश हा भगवंताची इच्छा आहे असे समजून तुम्ही तो प्रसाद भावनेने स्वीकारता तेव्हा ते तुमचे कर्म हे निष्काम कर्म होते. निष्काम कर्म म्हणजे भौतिकवादी, सांसारिक दृष्टिकोनातून पण अध्यात्मिक दिशेने केलेले कर्म होय.


*उपासना - कृतज्ञता.*

उपासना म्हणजे भक्ती. पण ही भक्ती म्हणजे कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेली आणि भारलेली भक्ती. तामिळ संत

तिरूकुरल फार छान सांगतात,

*जर कोणतेही कर्म तुम्ही कृतज्ञतापूर्वक भावनेने करत असाल तर त्या केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त कर्म करावे लागत नाही.*

जर कोणतेही कर्म करत असताना तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना नसेल आणि मनात राग, द्वेष असेल तर त्या कर्माचा पश्चाताप करण्याची वेळ येते.


ज्यावेळी आपण कृतज्ञतेच्या भावनेतून कर्म करतो तेव्हा ती सगुण उपासना होते. जेव्हा आपण सकाम उपासना करतो तेव्हा ती उपयुक्त उपासना होते कारण त्या उपासनेत आपण प्रार्थनापूर्वक अर्पण करत असतो.

अहिंसा प्रथमं पुष्पं

पुष्पम इंद्रिय निग्रह:

सर्वभूता दया पुष्पम

शांती पुष्पम

तपो पुष्पम

ज्ञानम पुष्पम तथैवच

सत्यम अष्टविध पुष्पम

विष्णो प्रीतीकरं भवेत.

अशा प्रकारे आठ प्रकारची पुष्पे अर्पण करून आपण कृतज्ञतापूर्वक पूजन म्हणजे कर्म केले पाहिजे.


अहिंसा प्रथमं पुष्पम म्हणजे मी कर्म करत असताना मी कोणालाही जाणतेपणे किंवा अजाणतेपणे दुःख देता कामा नये. मी चैतन्य म्हणजे ऊर्जा अर्पण करत आहे. ज्यायोगे आपापसात सहकार्याची सदभावना दृढ होईल. हीच खरी सगुण उपासना होय. *जे, जे भेटेल भूत त्यासी मानिजे भगवंत* हीच कृतज्ञतेची भावना होय. लक्षात ठेवा अशाप्रकारे केलेले कर्म जरी सकाम म्हणजे इच्छापूर्तीसाठी केलेले कर्म असेल तरी ते कर्म ही निष्काम उपासना होईल. उपासना म्हणजेच कृतज्ञता. कर्म हे एकरूप दर्शन आहे तर कर्माची विविध अंगे म्हणजे अनेक रूपदर्शन आहे.

क्रमशः पुढे चालू ... ...


धन्यवाद

सद्गुरुनाथ महाराज की जय.


  • जयंत जोशी

  • जीवनविद्या mission

....



What is Devotion?

Who is a True Devotee?

By Jayant Joshi – Jivan Vidya Mission


You might have already read the first article in this series titled “Where Should One Stop?” Building on that, today we will try to understand the literal, emotional, and deeper meanings of the first line of the 4th abhanga (verse) from Haripath:


Without feeling, there’s no devotion

Without devotion, no liberation

Without strength, no power

So, don’t speak in vain.


Literal Meaning:

If there is no inner feeling in devotion (worship), then such worship is not true devotion. And if you believe such mechanical devotion can lead to liberation, then that is as futile as speaking of strength without having any strength within you.


Let’s first understand what devotion truly means. Devotion is the unshakable faith and love we hold for any person, deity, principle, or action. "Bhav" (feeling) is deep, selfless, unconditional love. But then comes the question – what is love? Love has no definition. It cannot be fully expressed in words. One such attempt at defining love says:


"That which binds the heart and remains unshaken despite every reason for destruction is called love."


This "binding of the heart" is key. Even in the face of complete devastation, if something does not fall apart, that is love. Every action performed without love becomes mechanical. In spiritual practices, if there’s no love in the heart, the practice won’t reach completion. Instead, it may become a hindrance. Because action done without love won’t produce the right outcome, and we won’t reach the ultimate goal.


Such action becomes a mere title or label, like Jnaneshwar Mauli said,

“Empty speech is a false religion.”


Jnaneshwar Mauli emphasizes that "bhav" (feeling) is of utmost importance. Whether it's devotion, knowledge, or action – all require bhav. Without love for the Guru, knowledge cannot be attained. Without love in action, results won’t follow. Without feeling in yoga, yogic benefits won’t come.


Love cannot be spoken, yet it cannot remain unspoken. It tries to escape through words. But love is not conveyed through words; rather, it flickers like a steady flame in the heart. And when we try to express it, the wind of our speech may make the flame tremble or even extinguish it. Therefore, where true love exists, one does not need to speak. And when someone tries to demonstrate love with words, it often isn’t genuine. “I love you very much” is rarely true. True love is expressed not through words, but through behavior.


In short, whatever task falls into our hands – whether personal, familial, professional, or social – we must perform it with love. Our actions should be infused with devotional feeling.


Liberation means Moksha – the ultimate goal.

What is our goal while doing any action? It is to attain bliss. When we act with devotion and love, we experience supreme joy through the fulfillment of that task – that is liberation. As Sadguru says:


“Do your work,

Love your work,

Do it.

Let every action

Be for the nation

And for world peace.”


This nectar-like quote holds deep meaning. Every action of ours, and every gesture while performing it, must be done with love for the nation and the vision of global peace.


A true devotee is one who acts selflessly. Lord Krishna says in the Bhagavad Gita:


“Karmanye Vadhikaraste

Ma Phaleshu Kadachana”


This line has often been misunderstood to mean "Do your duty without expecting the result." But in truth, it means: you have the right to act, and the fruit of action is inherently tied to the action itself. You will receive the result in accordance with the nature and quality of your effort. Once an action is complete, its result is inevitable – this is the law of karma. So, don’t focus on the fruit while acting.


For example, in manufacturing, a product goes through multiple processes performed by different people. Each person is compensated according to their contribution and skill. Similarly, our results are aligned with our actions.


So, what is devotion? Who is a true devotee?

Devotion is loyalty. Devotion is surrender. Devotion is service. Devotion is faith. Devotion is knowledge.

Yoga means to unite – to connect and become one.


Who is God? God is not just Ram, Krishna, Buddha, or Allah – God is the whole (samasti), the entire universe.

"This universe is my home."

The whole creation is God. So, devotion means loyalty to this totality, faith in it, knowledge of it, and self-surrender to it.


Bhakti Yoga means making life devotional. Making life devotional is to bring wholeness into it.

Wholeness means viewing any concept or system in its entirety – not isolating individual parts but considering all components together, personally and collectively.


To bring wholeness into devotion, we must integrate feeling, service, faith, knowledge, and surrender. Devotion is incomplete if it lacks any of these. Only when all elements come together is it true devotion. Otherwise, it becomes artificial, mechanical.


The Tamil saint Tirukkural said:

"Just as your alphabet begins with the letter ‘A’, begin every act in life with the remembrance of God."


God here means perfection. Bringing perfection into every act is the highest form of devotion. When you work with wholeness, your actions bring you bliss and sanctity. Your ego dissolves, and you become more sensitive.


Consider this story:

A young man, not very educated, worked daily in his fields. Before beginning work, he would pray with a prayer book. One day he forgot his prayer book. At the field, he realized he couldn’t remember the words. He turned to God and said, “Lord, I don’t remember the prayer, but I do know the alphabet from A to Z. Since all prayers are made from these letters, you can arrange them into a prayer as you like. Accept this as my offering. I will continue my work with faith and love in you.”

This is true devotion.


– Jayant Joshi,

Jeevan Vidya Mission

 
 
 

Recent Posts

See All

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page