top of page

शिव म्हणजे काय? / What is Shiva ?

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

*महाशिवरात्र*


*महाशिवरात्रीच्या*

सर्वांना हार्दिक

शुभेच्छा!!!


भारतीय संस्कृतीमध्ये सणांना विशेष महत्त्व आहे. बहुतांश सणांचा उद्देश हा कशातरी प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये *कृतज्ञते* ला विशेष महत्त्व आहे. सद्गुरु देखील म्हणतात, *कृतज्ञता हेच पुण्य*


भारताच्या अध्यात्मिक दिनदर्शिकेत महाशिवरात्रीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तसे बघितले तर प्रत्येक महिन्यात अमावस्येच्या आदला दिवस हा महाशिवरात्र म्हणूनच असतो. परंतु फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला *महाशिवरात्र* संबोधले जाते. कारण या दिवशी भौगोलिक आणि खगोलीय स्थिती अशी असते की माणसात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या ऊर्जेचा वापर करून आपले जीवन अधिकाधिक उन्नत करण्यासाठी या संधीचा वापर करण्यासाठी महाशिवरात्र साजरी केली जाते.

*महाशिवरात्र ही जागरणाची रात्र नसून जागृतीची रात्र आहे.*


शिव म्हणजे काय?

शिवोsहम. मीच शिव आहे. शिव म्हणजे काय तर शं करोति मंगलम इति शिव. म्हणजे जो सर्वांचे मंगल म्हणजेच जो सर्वांचे चांगले करतो शुभ करतो तो शिव. सर्वांचे मंगल करणे म्हणजेच सर्वांचे शुभचिंतन करणे, देवा सर्वांचं भलं कर असं तळमळीने अंतर नादाने म्हणणारा व तसं प्रत्यक्ष घडून यावं अशी तीव्र अंतरिक इच्छा असणारा प्रत्येक जण म्हणजे *शिव* होय.


भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवतेला गुण प्रदान केलेले आहेत. हे गुण आपल्या म्हणजेच माणसाच्या अंगी बाणवावेत म्हणून देवतेची पूजा केली जाते.


श्रीकृष्ण म्हटला की आनंद लहरी, प्रेम लहरी आणि सौंदर्य लहरी ही त्याची गुणवैशिष्ट्ये असतात. तसेच शिव म्हटला की इच्छाशक्ती, विद्या शक्ती, आणि कार्यशक्ती ही शिवाची गुणवैशिष्ट्ये असतात.हे शिवाचे गुणवैशिष्ट्ये आपल्या अंगी बाणवावयाचे म्हणजे काय करायचे?

तर सद्गुरु म्हणतात,


शुभ ईच्छावे, शुभचिंतावे, वचनी शुभ बोलावे,

शुभकर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे.


इच्छाशक्ती: म्हणजे सर्वांप्रती शुभचिंतन. सगळ्यांचे भले होवो, सगळ्यांची भरभराट होवो, ही अंतर प्रेरणा जागृत होण्यासाठी विश्व प्रार्थना म्हणण्यासाठी शक्ती प्रदान व्हावी ही इच्छाशक्ती.


विद्या शक्ती: म्हणजे शुभचिंतन. शुभ चिंतनातूनच शुभइच्छा निर्माण होते आणि त्यासाठी आवश्यकता असते ती अभ्यासाची.चिंतन हीच विद्या शक्ती.


कार्यशक्ती: कार्यशक्ती म्हणजे शुभ कर्म करण्याची शक्ती.आपली प्रत्येक कृती ही स्वहिताची, कुटुंबाच्या हिताची, समाजाच्या हिताची आणि राष्ट्राच्या हिताची झाली की विश्वशांती होणारच.


हे करण्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञान, भक्ती आणि वैराग्य.


सध्या प्रयागराज येथे महाकुंभ चालू आहे. प्रयाग म्हणजे संगम. ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक नद्यांचा संगम होतो त्याला प्रयाग म्हणतात. आपल्या संस्कृतीत सप्त नद्या या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या मानलेल्या आहेत.


गंगेच, यमुनेचैव, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जलस्मीन संन्नीध्यम कुरू.


असा श्लोक आपल्या परंपरेत स्नानाच्या वेळी म्हणण्याची रुढी होती


या सप्त नद्यांपैकी गंगा, यमुना आणि सरस्वती यांना प्रमुख नद्या मानलेले आहे. या तीन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झाला त्याला *प्रयागराज* म्हटलेले आहे.


गंगा नदी हे ज्ञानाचे प्रतीक आहे, तर यमुना ही भक्तीचे प्रतीक आहे आणि सरस्वती ही वैराग्याचे प्रतिक आहे. गंगा आणि यमुना या दृश्य आहेत तर सरस्वती ही गुप्त आहे. ज्ञान आणि भक्ती आली की सरस्वती म्हणजेच वैराग्य हे अदृश्य स्वरूपात असतेच...

थोडक्यात जिथे ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा संगम होतो तिथे पवित्र असा महा कुंभ साजरा केला जातो.


आता प्रश्न निर्माण होतो की ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा संगम आपल्या ठिकाणी कसा साकार करायचा. तर त्याविषयी आपणास ज्ञान मिळते ते जीवन विद्येच्या तत्त्वज्ञानात.

या जीवन विद्येच्या तत्त्वज्ञानाच्या गंगेत स्नान करणे म्हणजेच महाकुंभ पर्वत स्नान करणे होय. प्रयागराज येथील कुंभपर्व हे 144 वर्षांनी आलेले आहे. मात्र जीवन विद्येच्या तत्त्वज्ञानाचे पर्व हे हजारो वर्षांनी प्रगट झालेले आहे. या पर्वत स्नान करणे ही भाग्याची गोष्ट आहे.

जय सद्गुरू जय जीवन विद्या


जयंत जोशी

जीवन विद्या मिशन



Mahashivratri


**Wishing everyone a very Happy Mahashivratri!**


Festivals hold special significance in Indian culture. Most festivals are intended to express gratitude in some form. Gratitude is given a special place in Indian culture. Even Sadhguru says, *Gratitude itself is virtue.*


In India’s spiritual calendar, Mahashivratri holds a significant place. In fact, every month, the day before Amavasya (new moon) is considered a Shivratri. However, the Shivratri that falls in February or March is known as *Mahashivratri.* On this day, the geographical and astronomical conditions are such that there is a natural surge of energy in a person. Mahashivratri is celebrated to take advantage of this energy to elevate one’s life.

**Mahashivratri is not a night of staying awake but a night of awakening.**


# What is Shiva?


*Shivoham* – I am Shiva. But what is Shiva? The meaning of *Sham karoti mangalam iti Shiva* is – one who brings well-being and goodness to all is Shiva. Wishing for the well-being of all, sincerely praying for everyone’s welfare, and having an intense inner desire for it to manifest – such a person becomes *Shiva.*


In Indian culture, every deity is attributed with certain qualities. The worship of deities is meant to cultivate those virtues within human beings.


For instance, when we think of Lord Krishna, he embodies waves of joy, love, and beauty. Similarly, when we think of Shiva, he represents willpower (*Ichha Shakti*), knowledge (*Vidya Shakti*), and action (*Karya Shakti*). How do we inculcate these qualities of Shiva within us?


Sadhguru says:


**Wish for good, think good, speak good,

Through the power of good deeds, make life golden.**


1. **Willpower (Ichha Shakti):** This means having goodwill for all. May everyone prosper and flourish—awakening this inner inspiration and gaining the strength to offer universal prayers is *Ichha Shakti.*

2. **Knowledge (Vidya Shakti):** This means noble thinking. Noble thoughts arise from noble intentions, which in turn require learning and reflection. Thoughtfulness itself is *Vidya Shakti.*

3. **Action (Karya Shakti):** This means the power to do good deeds. When every action benefits oneself, one’s family, society, and the nation, it naturally leads to world peace.


To achieve this, one needs **knowledge, devotion, and detachment.**


# The Spiritual Significance of the Kumbh Mela


Currently, the *Mahakumbh* is being celebrated in Prayagraj. The word *Prayag* means confluence. A place where two or more rivers meet is called *Prayag.* In Indian tradition, seven rivers are considered sacred and highly significant:


Ganga, Yamuna, Godavari, Saraswati, Narmada, Sindhu, and Kaveri.


There was a tradition of reciting this verse during bath time:


*"Gangecha Yamunechaiva Godavari Saraswati

Narmade Sindhu Kaveri jalesmin sannidhim kuru."*


Among these seven rivers, the Ganga, Yamuna, and Saraswati are considered the most important. The place where these three rivers meet is known as *Prayagraj.*


1. Ganga symbolizes knowledge.

2. Yamuna represents devotion.

3. Saraswati signifies detachment.


While the Ganga and Yamuna are visible, Saraswati remains hidden. When knowledge and devotion are present, detachment naturally manifests in an invisible form.


In essence, where knowledge, devotion, and detachment converge, that is where the sacred *Maha Kumbh* is celebrated.


# How to Attain the Union of Knowledge, Devotion, and Detachment?


The real question is, how do we cultivate this confluence within ourselves? The answer lies in the philosophy of *Jeevan Vidya* (Life Knowledge). Bathing in the sacred river of *Jeevan Vidya* is equivalent to taking a holy dip in the Mahakumbh.


The *Kumbh Mela* at Prayagraj happens once every 144 years, but the wisdom of *Jeevan Vidya* has been revealed after thousands of years. Participating in this great wisdom is truly a blessing.


Jai Sadguru! Jai Jeevan Vidya!


  • Jayant Joshi

    Jeevanvidya mission

 
 
 

Recent Posts

See All

ज्ञानं बंधनम / Knowledge is bondage

*"ज्ञानं बंधनम"* *क्षणाक्षणाला शिकणे* *या नावं शिक्षण* सद्गुरु वामनराव पै म्हणतात, *क्षणाक्षणाला शिकणे* *म्हणजे शिक्षण* प्रत्येक जण हा...

Comentários


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page