top of page

The Power of Emotions/ भावना शक्ती

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

*भावना शक्ती*

सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, परमेश्वराने मानवाला अनेक शक्ती प्रदान केलेल्या आहेत. जसे कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, विचार शक्ती इत्यादी. आपल्या या शक्ती सूक्ष्म स्वरूपात असतात. सूक्ष्माचे रूपांतर स्थुलात आणि स्थुलाचे रूपांतर सूक्ष्मात हे चक्र जसे सतत निसर्गात चालू असते तसेच ते सतत आपल्या शरीराच्या ठिकाणी देखील चालू असते.


मानवी मन हे प्रचंड सामर्थ्यवान आहे. मन म्हणजे काय? तर संकल्प विकल्प करणाऱ्या अंतकरणाला मन असे म्हणतात.

सद्गुरु म्हणतात, मन नावाचे तत्व आपल्या ठिकाणी नांदते याची आपल्याला कल्पनाच नसते.भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात इंद्रियांमध्ये मी मन आहेसद्गुरु म्हणतात मन हे सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजेच मन हेच ईश्वर आहे.

या मनाची व्याख्या करताना सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणतात, आपले मन म्हणजे एक समभुज त्रिकोण आहे. ज्याची एक बाजू ही भावना, दुसरी बाजू ही विचार, आणि तिसरी बाजू ही वर्तणूक आहे. यापैकी भावना आणि विचार हे सूक्ष्म आहेत तर वर्तणूक ही स्थूल आहे. भावना आणि विचार दिसत नाहीत. पण आपली वर्तणूक दिसते. म्हणजेच आपली वर्तणूक ही आपल्या भावना आणि विचारांवर अवलंबून असते. विचारांना प्रेरणा भावना देतात.


विचार या विषयावर आपण यापूर्वी चर्चा केली आहे.आज आपण भावना याविषयी चर्चा करणार आहोत.


भावना म्हणजे काय?

भावना म्हणजे, जाणीवपूर्वक मानसिक प्रतिक्रिया जसे की राग किंवा भीती.

भावना म्हणजे न्यूरो फिजिओलॉजिकल बदलांमुळे उद्भवलेल्या शारीरिक आणि मानसिक स्थिती. विचार,भावना, वर्तणूक, प्रतिक्रिया आणि आनंद किंवा नाराजी यांचा संबंध काही प्रमाणात भावनांशी आहे.

भावनेच्या व्याखे वर शास्त्रज्ञांचे एक मत नाही.

आपण देखील या व्याख्यांच्या फंदात न पडता थोडक्यात हे लक्षात घेऊ की आपले वर्तन हे आपल्या भावनांवर अवलंबून असते.


आयुर्वेदामध्ये आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे तीच मुळे

*प्रकृती इति शरीरम आणि प्रकृती इति स्वभावम.*

अशी केलेली आहे म्हणजे या सगळ्या ज्या पारंपारिक आरोग्य पद्धती आहेत त्याच्यामध्ये शरीर आणि मनाला बऱ्यापैकी एकजीव केलेले आहे आणि त्याच्याकडे तसंच पाहिलेल आहे.


भावना आणि आरोग्य यांचा संबंध काय? किंवा भावनिक आरोग्य हे का महत्त्वाच आहे.

डब्ल्यू एच ओ ची हेल्थची व्याख्या आहे - *हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल,नॉट मियर अबसेन्स ऑफ डिसीज, बट वेलबीईंग.*

स्टेट ऑफ कंप्लिट फिजिकल अँड मेंटल यामध्ये भावानिक हा शब्द महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की, आपण कितीही रॅशनॅलिटीच्या म्हणजे तर्कशुद्धतेच्या म्हणजे सारासार विवेकाच्या गोष्टी केल्या तरी सत्य हेच आहे की माणूस हा एक भावनिक प्राणी आहे. आणि आपण जगातल्या सगळ्या समस्यांचा सामना पहिले भावनिक अंगांनी करतो. कुठल्याही समस्येला आपण भावनांनी सामोरे जातो.


माणूस एवढा भावनिक का वागतो ?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपला आजचा जो मेंदू आहे त्याची उत्क्रांती कशी झाली? मेंदूचे कार्य कसे चालते ते समजून घेतले पाहिजे.

आपला आजचा मेंदू हा आजच्या स्थितीत येण्यासाठी च्या उत्क्रांतीने तब्बल ३० कोटी वर्ष घेतलेली आहेत. आजच्या या मेंदूचे तीन भाग प्रामुख्याने आहेत.

१. लिम्बिक सिस्टीम

२. कॉर्टेक्स

३. प्री फ्रोंटल न्यूओ काॅर्टेक्स.

मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे बघितले तर

१. पूर्व मानव

२. आदिमानव

३. मानव

४. प्रगत मानव

५. आधुनिक मानव

असे दिसून येतात.

यातील आदिमानव, प्रगत मानव व आधुनिक मानव हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. कारण या तीन टप्प्यातच मानवी मेंदूची प्रगती झालेली आहे.


आपण ज्याला भावना म्हणतो, त्या भावना कुठून आल्या? तर त्या आल्या लिम्बिक सिस्टीम मधून. माणसाची आजची जी भावनिक स्थिती आहे, त्या संबंधीत मेंदूचा जो भाग आहे तो आहे तीस कोटी वर्षांपूर्वीचा. जो आदिमानवाचा मेंदू होता. रॅशनल थिंकिंग किंवा सारासार बुद्धी देणारा जो मेंदूचा भाग आहे ज्याला आपण प्री फ्रोंटल न्यूओ र्कॉर्टैक्स म्हणतो तो मात्र आहे फक्त वीस हजार वर्षांपूर्वीचा. इतकी मोठी ही उत्क्रांतीच्या काळाची तफावत आहे. आणि आश्चर्य म्हणजे आजही आपला मेंदू रेपटीलियन लिम्बिक सिस्टीमवरच प्रामुख्याने काम करतो. रेपटीलियन लिम्बिक सिस्टीम म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मेंदूमधील जी भावनिक जडणघडण आहे, जी यंत्रणा आहे तीच आजही आपल्या मेंदूची जडणघडण आणि यंत्रणा कार्यरत आहे.

आदिमानवाच्या काळात जीवनाच्या दोनच प्रेरणा होत्या आणि त्याच आजच्या आधुनिक मानवाच्या देखील आहेत.त्या म्हणजे, जगणे आणि पुनरुत्पादन करणे. आदी मानवा पुढे जी आव्हाने होती ती केवळ जीवशास्त्रीय होती. म्हणजेच ती आव्हाने ही *मी* पुरती मर्यादित होती. त्यामुळे त्यावेळच्या भावना देखील मर्यादित होत्या. आणि त्या आदिम भावना म्हणजे फाईट, फ्लाईट, फ्रिझ.

जसजसा मानवी जीवनाचा विकास होत गेला तस तसा माणूस हा *मी* कडून *आम्ही* कडे सरकला, आणि मेंदूची उत्क्रांती देखील लिंम्बीक सिस्टीम कडून कॉर्टेक्स कडे झाली. यामुळे माणसाचे ठिकाणी *आम्ही* म्हणजे कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादी यांचा विचार होत गेल्याने त्या अनुषंगिक भावना निर्माण झाल्या. त्या म्हणजे सहकार्य, प्रेम, आपुलकी, आदर, परस्परावलंबन, जगा आणि जगू द्या इत्यादी भावनांची निर्मिती झाली. आजच्या आधुनिक मानवाला प्री फ्रोंटल निओ काॅर्टेक्स मुळे उन्नत भावना प्रदान झालेल्या आहेत. त्या म्हणजे अस्था, करुणा, दया, तन्मयता, समर्पण, नम्रता, कृतज्ञता, निरपेक्ष त्याग, निर्मळता, क्षमा, निग्रह, सहिष्णुता, कैवल्य इत्यादी. या सर्व भावना या *मी* किंवा *आम्ही* पेक्षा *सर्वांशी* निगडित आहेत. या सर्व भावनांना आपण अध्यात्मिक भावना म्हणू.


पण मेंदूच्या कार्याची गंमत अशी की, आज आपली जी लिम्बीक सिस्टीम आहे ते आपले हार्डवेअर झालेले आहे तर प्रि फ्रोंटल न्यूओ काॅर्टेक्स हे आपले सॉफ्टवेअर आहे. हार्डवेअर हे आपोआप वापरले जाते मात्र सॉफ्टवेअर हे जाणीवपूर्वक वापरावे लागते. त्यामुळे आजही आपल्यावर आपल्या आदीम मेंदूचेच प्रभुत्व आहे. म्हणूनच जीवनातील कोणत्याही समस्ये कडे आजही आपण जीवशास्त्रीय भावना म्हणजे फाईट, फ्लाईट आणि फ्रिझ यांच्यातूनच बघतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की, आपल्या मनात जास्तीत जास्त नकारात्मक विचार का येतात?


मानवाची भौतिक प्रगती ज्या वेगाने झाली त्या वेगाने माणसाची शारीरिक आणि मानसिक प्रगती मात्र झालेली नाही.आणि खरं बघता आजच्या अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांचे मूळ यातच आहे.


भावनांचे नियंत्रण कसे करायचे? त्यासाठी काय करावे लागणार? याचा विचार आपण पुढे करू .


धन्यवाद.


*सद्गुरु नाथ महाराज की जय.*




*The Power of Emotions*:


Sadguru Shri Vamanrao Pai says that God has endowed human beings with many powers, such as imagination, memory, and the power of thought. These powers exist in a subtle form. Just as the cycle of transformation from subtle to gross and vice versa continuously occurs in nature, the same process constantly takes place within our bodies.


The human mind is immensely powerful. What is the mind? It is the inner faculty that makes decisions and counter-decisions. Sadguru says that we are often unaware that the mind exists within us. In the Bhagavad Gita, Lord Krishna states, "Among the senses, I am the mind." Sadguru explains that the mind is supreme, meaning that the mind itself is God.


Defining the mind, renowned psychologist Dr. Anand Nadkarni describes it as an equilateral triangle with three sides: emotions, thoughts, and behavior. Among these, emotions and thoughts are subtle, whereas behavior is gross. Emotions and thoughts are invisible, but behavior is visible. This means that our behavior depends on our emotions and thoughts. Emotions drive thoughts.


We have previously discussed thoughts. Today, let us discuss emotions.


### What are emotions?

Emotions are conscious mental reactions, such as anger or fear. They are physical and mental states arising due to neurophysiological changes. Thoughts, emotions, behavior, reactions, and feelings of joy or displeasure are all connected to emotions to some extent. Scientists do not agree on a single definition of emotions. However, rather than getting caught up in definitions, we should simply understand that our behavior is influenced by our emotions.


In Ayurveda, health is defined as:

*"Prakriti iti shariram" and "Prakriti iti swabhavam."*

This means that traditional health sciences have closely linked the body and mind, treating them as one.


### The Connection Between Emotions and Health

Why is emotional health important? The World Health Organization (WHO) defines health as:

*"Health is a state of complete physical, mental, and social well-being, not merely the absence of disease."*

In this definition, the term "emotional" is crucial. No matter how rational or logical we try to be, the truth is that humans are emotional beings. We respond to all problems in the world primarily through emotions.


### Why Do Humans Behave Emotionally?

To understand this, we need to explore the evolution of the human brain and its functioning.


Our present brain has taken nearly 300 million years to evolve. It has three primary parts:

1. Limbic System

2. Cortex

3. Prefrontal Neo-Cortex


The stages of human evolution can be categorized as:

1. Early Humans

2. Primitive Humans

3. Humans

4. Advanced Humans

5. Modern Humans


Among these, the Primitive Human, Advanced Human, and Modern Human stages are crucial because they mark significant brain development.


Where do emotions originate? They come from the limbic system, a part of the brain that has existed for 300 million years, dating back to primitive humans. In contrast, the part of the brain responsible for rational thinking, the prefrontal neo-cortex, has existed for only about 20,000 years. This stark difference in evolutionary timelines is significant. Even today, our brain primarily operates on the reptilian limbic system.


The reptilian limbic system governs emotional mechanisms similar to those found in the brains of reptiles. In the era of primitive humans, life had only two main motivations: survival and reproduction. The challenges faced were purely biological and centered around "me." Therefore, emotions were also limited, primarily revolving around the "fight, flight, or freeze" responses.


As human civilization evolved, people transitioned from "me" to "we," leading to the evolution of the brain from the limbic system to the cortex. This shift introduced emotions such as cooperation, love, affection, respect, interdependence, and the philosophy of "live and let live."


Modern humans, thanks to the prefrontal neo-cortex, have developed higher emotions such as faith, compassion, kindness, dedication, humility, gratitude, selfless sacrifice, purity, forgiveness, restraint, tolerance, and enlightenment. These emotions transcend the "me" or "we" mindset and connect us to "everyone." These can be called spiritual emotions.


However, an interesting aspect of brain function is that the limbic system acts as our "hardware," whereas the prefrontal neo-cortex is our "software." Hardware functions automatically, while software must be used consciously. This means that even today, our primitive brain dominates us. That is why, even in modern times, we still respond to problems with the same basic survival emotions—fight, flight, or freeze. This explains why negative thoughts dominate our minds.


While material progress has advanced rapidly, physical and mental evolution has not kept pace. This disparity is at the root of many modern physical, mental, and social problems.


### How to Control Emotions?

What can we do to regulate them? We will discuss this further in the next section.


Thank you.


Sadguru Nath Maharaj Ki Jai.


— Jayant Joshi

Jeevan Vidya Mission



 
 
 

Recent Posts

See All

ज्ञानं बंधनम / Knowledge is bondage

*"ज्ञानं बंधनम"* *क्षणाक्षणाला शिकणे* *या नावं शिक्षण* सद्गुरु वामनराव पै म्हणतात, *क्षणाक्षणाला शिकणे* *म्हणजे शिक्षण* प्रत्येक जण हा...

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page