top of page

The Power of Thoughts/ विचारांचे सामर्थ्य

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

*विचारांचे सामर्थ्य:


विचारांचा आपल्या शरीरावर म्हणजेच आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो.

मागील एका लेखात आपण बघितले की, सूक्ष्माचे रूपांतर स्थुलात आणि स्थुलाचे रूपांतर सुक्ष्मात होत असते आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.


आपले विचार आपल्या आरोग्याला कसा आकार देतात?

आपण आरोग्याबद्दल ज्या प्रकारे विचार करतो ते आपले विचार आश्चर्यकारकरीत्या आपल्या आरोग्यावर, आपल्या वर्तनावर आणि आपल्या जीवनावर परिणाम करतात.


शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. ज्यात काही वृद्ध व्यक्तींना एक पुनर्निर्मित वातावरणात राहावयास दिले, जेथे सगळे वातावरण हे वीस वर्षांपूर्वीचे तयार केलेले होते, म्हणजेच ज्यात वीस वर्षांपूर्वी प्रचलित असलेले फर्निचर,त्याकाळी प्रचलित असलेले उपकरणे, आणि त्या वेळीची मासिके व वर्तमानपत्रे ठेवलेली होती. या सर्व वृद्धांना आपण तरुण आहोत असे जगण्यास सांगितले. या सर्वांनी वीस वर्षांपूर्वीच्या घटना जणूकाही आत्ताच घडत आहेत अशी चर्चा केली.असा हा प्रयोग 8 दिवस चालला होता.या प्रयोगाचे निकाल थक्क करणारे होते. कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपा शीवाय त्यांची श्रवण शक्ती, दृष्टी, स्मरणशक्ती आणि त्यांची ताकद यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. आठवड्याच्या अखेरीस जेव्हा त्या सर्वांचे छायाचित्रे घेतली गेली तेव्हा त्या छायाचित्रांमध्ये ते लक्षणीयरीत्या आतापेक्षा जास्त तरुण असल्याचे दिसून आले.


शास्त्रज्ञांना एका प्रयोगात असा आढळलं की थकव्याचा विचार केल्याने लोकांना अधिक थकवा जाणवतो. आपल्याला सर्दी होईल असा विचार मनात आला तर सर्दी होण्याची शक्यता 200 पटीने वाढते. या पाठीमागचे तत्व सोपे आहे. ज्या ठिकाणी आपण आपले मन केंद्रित करतो ते आकाराला येते. कारण जिथे आपण आपले मन लावतो तिथे आपले शरीरही असते.


दुसऱ्या एका प्रयोगात असं दिसून आलं की ज्या लोकांनी व्यायामापासून माझे वजन कमी होईल अशा अपेक्षेच्या विचाराने व्यायाम केला त्यांचे वजन खरोखरच कमी झाले. मात्र ज्यांनी असा विचार केला नाही त्यांनी व्यायाम करूनही त्यांचे वजन कमी झाले नाही.


शास्त्रज्ञांनी विचारांचा परिणाम साखरेच्या पातळीवर कसा व किती होतो याबाबत प्रयोग केले. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की डॉक्टर निदानाला जे लेबल लावतात त्याचा देखील माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. मधुमेहाच्या चाचणीत जेव्हा ए 1 सी नावाच्या हिमोग्लोबिन चाचणीत ज्यांची पातळी 5.6% किंवा 5.7% आली त्यांना सामान्य म्हणून सांगितले गेले. परंतु ज्यांची चाचणी त्यापेक्षा जास्त आली तेव्हा त्यांना प्री डायबेटिक म्हणून सांगण्यात आले आणि काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यापैकी 70 टक्के लोकांना औषधे दिली असून सुद्धा व त्यांनी आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल केले असून सुद्धा पुढच्याच चाचणीत त्यांची ए वन सी ची पातळी वाढलेली दिसून आली. हे का झाले तर ते सतत शुगर आणि डायबिटीज याचाच विचार करत होते. हा केवळ *प्री डायबिटीस* या लेबलचा परिणाम होता. याला वैद्यकीय भाषेत *बॉर्डर लाईन इफेक्ट* असे संबोधले जाते. शास्त्रज्ञ म्हणतात, जेव्हा एखाद्या वैद्यकीय स्थितीसाठी एक सीमारेषा आखली जाते तेव्हा त्या सीमारेषेच्या वरचे व त्या सीमारेषेच्या खालचे लोक मूलतः समान असतात परंतु केवळ लेबल लावल्यानंतर विचारांच्या परिणामामुळे आरोग्याबाबत भिन्न परिणाम दिसतात.


एकत्रितपणे या संशोधनांचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की जेव्हा लोक स्वतःला मनाने आजारी समजू लागतात तेव्हा खरे बघितले तर ते प्रत्यक्षात निरोगी असू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या आपले शरीर कसे कार्य करते आणि निरोगी असणे म्हणजे काय याबद्दल वेगवेगळ्या श्रद्धा असतात. ज्या त्यांच्या विचारांवर परिणाम करतात. संशोधन असे सांगते की, लोक त्यांच्या पूर्व अनुभवांवर आणि पूर्वग्रहांवर अवलंबून विचार करून आंतरिक विश्वास विकसित करत असतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने कुठेतरी एखाद्याच्या आजाराविषयी वाचले किंवा ऐकले तरी तो आपल्या ठिकाणी त्या आजाराची चिन्हे शोधू लागतो.अशावेळी असे लोक सतत काय विचार करतात आणि त्यांना काय वाटते ते पुढे काय होणार ते ठरविते.


*निरोगी जगणे हे*

*निरोगी*

*विचारांचे कार्य आहे.*


आपल्या विचारांना आपले शरीर कसे प्रतिसाद देते आणि विचार कसा आकार घेतात त्याचा प्रत्यक्ष प्रयोग आपण उद्याच्या लेखात बघणार आहोत.


धन्यवाद

देवा सर्वांचं भलं कर l

देवा सर्वांचं कल्याणकर l

देवा सर्वांचा संसार सुखाचा कर l

देवा सर्वांची भरभराट होऊ दे l


*देवा सर्व निरामय व*

*आरोग्यदायी राहू दे ll*


जयंत जोशी

जीवन विद्या मिशन



*The Power of Thoughts:


Our thoughts have an impact on our body, namely on our health.


In a previous article, we saw that the transformation of the subtle into the gross and the gross into the subtle is a continuous process.


How do our thoughts shape our health? The way we think about our health—our thoughts—surprisingly affects our health, our behavior, and our life.


Scientists conducted an experiment in which some elderly individuals were placed in a recreated environment set up as it was twenty years ago—with furniture, appliances, magazines, and newspapers from that time. These elderly individuals were told that they were young and discussed as if events from twenty years ago were happening right now. This experiment lasted for eight days. The results were astonishing: without any medical intervention, there was a significant improvement in their hearing, vision, memory, and strength. When photographs were taken at the end of the week, they appeared considerably younger than before.


In another experiment, scientists found that thinking about fatigue makes people feel more tired. When one entertains the thought of catching a cold, the likelihood of actually developing a cold increases by 200 times. The underlying principle is simple: wherever we focus our mind, our body follows.


In yet another experiment, it was observed that those who exercised with the expectation that their weight would decrease did indeed lose weight, whereas those who exercised without that expectation did not see any weight loss.


Scientists also conducted an experiment to determine how and to what extent our thoughts affect blood sugar levels. They discovered that the labels doctors assign during diagnosis can impact a person’s health. In a diabetes test, individuals whose A1C levels were 5.6% or 5.7% were told they were normal. However, those whose results were slightly higher were labeled as pre-diabetic and given recommendations for care. Even though 70 percent of these individuals were given medication and made the necessary lifestyle changes, their A1C levels increased in subsequent tests. This occurred because they were constantly thinking about sugar and diabetes. This is merely the result of the pre-diabetic label—what medical professionals call the borderline effect. Scientists explain that when a threshold is set for a medical condition, people just above and just below that threshold are essentially the same, yet the impact of the label on their thoughts leads to different health outcomes.


Taken together, these studies reveal that when people begin to perceive themselves as ill, they may actually be healthy. Each individual holds different beliefs about how their body functions and what it means to be healthy, and these beliefs influence their thoughts. Research suggests that people develop internal convictions based on their past experiences and prejudices. For example, if someone reads or hears about a particular illness, they may start to notice its symptoms in themselves. In such cases, what they consistently think and feel determines what will happen next.


Healthy living is the work of healthy thoughts.


We will observe a practical demonstration of how our body responds to our thoughts and how our thoughts take shape in the next article.


Thank you


May God bless everyone, may God bring welfare to all, may God make everyone’s life full of happiness, and may God bestow prosperity upon all.


May God keep everyone free from illness and grant us lasting health.


-Jayant Joshi

Jivan Vidya Mission

 
 
 

Recent Posts

See All

ज्ञानं बंधनम / Knowledge is bondage

*"ज्ञानं बंधनम"* *क्षणाक्षणाला शिकणे* *या नावं शिक्षण* सद्गुरु वामनराव पै म्हणतात, *क्षणाक्षणाला शिकणे* *म्हणजे शिक्षण* प्रत्येक जण हा...

תגובות


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page