top of page

The Supreme Power Within: Unveiling the Wonders of the Human Body and Mind / अंतर्निहित परमशक्ती: मानव शरीर आणि मेंदूचे अद्भुत रहस्य:

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

The Supreme Power Within: Unveiling the Wonders of the Human Body and Mind


Sadhguru says,


The body itself is the Supreme Being.


If you want to experience the Supreme Being, observe the system of your body.


Sadhguru defines the Supreme Being as a self-regulated, self-controlled, natural, and systematic arrangement governed by the laws of nature.


Observe your body carefully. The entire functioning of your body operates according to the laws of nature. Everything happens automatically. It is also self-regulated. The entire system of the body is natural and systematic.


That is why Sadhguru says, the body itself is the Supreme Being.


There are numerous complex mechanisms within our body. However, Sadhguru emphasizes that there is no confusion or disorder in this complexity.


A vital part of our body is the brain. The structure and functioning of the brain are astonishing and incredible.


Did you know that approximately 100 billion neurons are actively working in our small brain to regulate bodily functions?


The memory capacity of our brain is around 2.5 petabytes. One petabyte equals one million gigabytes. Truly, the memory power of our brain is immense.


Each neuron has a tail, and if all the tails of the neurons in our brain are put together, their total length would be around 150,000 kilometers. Isn't that amazing?


If asked how many brains are present in the human body, most people would say one. However, our body has three functioning brains:


1. The commonly known brain in our head.

2. The brain in our digestive system.

3. The heart-brain within us.


Many of us are aware of the gut-brain connection. But scientists have recently discovered that around 40,000 neurons are actively working in the human heart. Through these neurons, the heart also functions similarly to the brain.


If we buy a mobile phone worth ten or twenty thousand, we carefully study its user manual before using it. However, we never take the time to understand the invaluable brain that controls our entire life.


Sadhguru says that thought is the emperor of the universe, meaning our thoughts shape our lives. The natural tendency of thoughts is to move toward manifestation.


As our thoughts are, so does our life take shape.


How do thoughts begin? What inspires these thoughts? In short, we rarely think about the nature of our own thoughts.


Sadhguru says that humans are thinking beings. But in reality, we perform many daily activities without conscious thought.


The power of thought is immense. Whether life becomes a heaven or a hell depends entirely on our thoughts. Our present thoughts shape our future.


The brain plays a significant role in forming our thought patterns.


We are now going to explore how the brain participates in thinking and how it functions.


— Jayant Joshi

Jeevanvidya Mission



तर्निहित परमशक्ती: मानव शरीर आणि मेंदूचे अद्भुत रहस्य:


सद्गुरु म्हणतात,

*शरीर साक्षात परमेश्वर*

*आहे.*


परमेश्वराची प्रचिती यावयाची असेल तर आपल्या शरीराच्या व्यवस्थेकडे बघा.


सद्गुरु परमेश्वराची व्याख्या अशी करतात,


*निसर्ग नियमा सहित*

*स्वयंचलित, स्वयं*

*नियंत्रित, नैसर्गिक,*

*पद्धतशीर व्यवस्था,*

*म्हणजे परमेश्वर.*


काळजीपूर्वक आपल्या शरीराकडे बघा. आपल्या शरीराचा सर्व कारभार निसर्ग नियमांनी चाललेला आहे. सर्व काही स्वयंचलित चाललेले आहे. तसेच ते स्वयं नियंत्रित आहे. संपूर्ण शरीर व्यवस्था ही नैसर्गिक व पद्धतशीर आहे.

आणि म्हणूनच सद्गुरु म्हणतात, शरीर साक्षात परमेश्वर आहे.


आपल्या शरीरात अनेक गुंतागुंतीच्या यंत्रणा आहेत. असे असले तरी सद्गुरु म्हणतात कुठेही गुंता मात्र नाही.


आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला मेंदू.

या मेंदूची रचना तसेच कार्य करण्याची पद्धत ही अतिशय विस्मयकारक व आश्चर्यजनक आहे.


तुम्हाला कल्पना आहे कां, की आपल्या या छोट्याशा मेंदूत किती न्यूरान्स कार्यरत आहेत. थोडे थोडके नाही तर 100 बिलियन एवढे न्यूरॉनस आपल्या शरीराचे कार्य करण्याकरता सतत कार्यरत असतात.


आपल्या मेंदूची स्मरणशक्तीची ताकद किती आहे तर ती आहे 2.5 पेटा बाईट. 1 petabyte is equal to 1 million gigabyte. खरोखर आपल्या या मेंदूची किती प्रचंड स्मरणशक्ती आहे.


या प्रत्येक न्यूरोन्सला एक शेपटी असते सर्व न्यूरोन्सच्या शेपट्या एकत्र केल्या तर त्याची लांबी एक लाख 50 हजार किलोमीटर एवढी होते.

आहे की नाही सगळंच आश्चर्यकारक.


तुम्हाला जर विचारलं की आपल्या शरीरात किती मेंदू आहेत तर बहुतेकांचे उत्तर १ असेच येईल परंतु आपल्या शरीरात तीन मेंदू कार्यरत आहेत एक सर्वमान्य आपल्या मस्तिष्का मधला मेंदू , दोन आपल्या पचनसंस्थेतला मेंदू , तीन आपल्यातील हृदयस्थ मेंदु. आपल्या सर्वांनाच गट ब्रेन कनेक्शन माहिती आहे.परंतु नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की आपल्या हृदयात देखील 40,000 न्यूरॉनस कार्यरत आहेत. या न्यूरॉनस द्वारे आपले हृदय देखील मेंदूप्रमाणे कार्य करते.


आपण दहा वीस हजाराचा मोबाईल घेतला तरी आपण हा मोबाईल वापरण्यापूर्वी त्या मोबाईलच्या युजर मॅन्युअल चा अभ्यास करतो. मात्र आपल्या शरीरात असलेला अमूल्य मेंदू जो आपल्या जीवनाचे नियंत्रण करतो त्याच्याबद्दल मात्र आपण कधीच काहीही माहिती घेत नाही.


सद्गुरु म्हणतात विचार हा विश्वाचा सम्राट आहे म्हणजेच विचारांनीच जीवन घडते कारण विचारांचा नैसर्गिक गुणधर्म हा आकाराकडे सरकण्याचा असतो. म्हणजेच

*जसा विचार तसा जीवनाला आकार*

प्राप्त होतो.


या विचारांची सुरुवात कशी होते? या विचारांना प्रेरणा कोण देतो? थोडक्यात विचारांचा विचार आपण कधीही करत नाही. सद्गुरु म्हणतात मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक कामे ही विचाराविनच आपण करत असतो.


विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. जीवनाचा स्वर्ग करायचा कि नर्क करायचा हे आपल्या विचारांवरच ठरते. आपले आजचे वर्तमानातील विचार हेच आपले भविष्यातले जीवन घडवीत असतात.


या आपल्या विचारांच्या पॅटर्नचे प्रमुख कार्य करण्यामध्ये मेंदूचा महत्त्वाचा वाटा असतो.


विचार करण्यामध्ये मेंदूचा सहभाग कसा असतो मेंदू कसे कार्य करतो हे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.


- जयंत जोशी

जीवनविद्या मिशन

 
 
 

Recent Posts

See All

ज्ञानं बंधनम / Knowledge is bondage

*"ज्ञानं बंधनम"* *क्षणाक्षणाला शिकणे* *या नावं शिक्षण* सद्गुरु वामनराव पै म्हणतात, *क्षणाक्षणाला शिकणे* *म्हणजे शिक्षण* प्रत्येक जण हा...

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page