
As You Think, So It Manifests: The Power of Thoughts and Vibrations
The natural tendency of thoughts is to take shape. In simple terms, the way we think shapes our lives. Whatever we think eventually manifests in reality.
Observing how thoughts take shape is truly fascinating.
Scientists say,
"There is nothing other than vibrations. Everything in this universe is vibration. You can create anything through vibrations, and you can also destroy anything through vibrations."
In the 126th verse of the second chapter of *Dnyaneshwari*, Saint Dnyaneshwar says:
*"Yaa upadhimaji gupt, chaitanya ase sarvagat,
Te tatvagya sant, swikariti."*
In essence, everything—whether visible objects that we can touch and see or invisible elements like thoughts and emotions that we can only experience—exists purely as vibrations in different frequencies. The entire universe is filled with the energy of consciousness.
The frequency of these vibrations, or the energy of consciousness, can be altered. This is why Sadhguru says:
"Change your thoughts, and your destiny will change."
Naturally, this raises the question: How do we change our thoughts?
Thoughts are a form of energy, and so are desires, which arise from emotions. When the frequencies of thoughts and desires align, only then does the subtle transform into the tangible. In other words, thoughts take physical form.
Albert Einstein’s famous equation states:
E = mc²
This means that energy and matter are interchangeable.
Here, E represents energy, which corresponds to thoughts, and M represents matter, which corresponds to physical reality.
For example, the thought "I want to be wealthy" is an energy (subtle force), while money is matter (physical force).
Energy cannot be destroyed; it can only be transformed.
In this universe, the cycle of transforming the subtle into the tangible and vice versa is always in motion.
You are a human transmission tower. Through your thoughts, you are constantly emitting energy. If you wish to bring about any change in your life, you must first change your thoughts, thereby altering the vibrations of your energy field.
Your present thoughts shape your future.
Whatever you think about the most, whatever you focus on the most, eventually manifests in your life. Your thoughts take form.
When emotions are attached to your thoughts, they become more powerful and gain momentum.
This brings us to some key questions:
What exactly are thoughts?
Who generates thoughts?
How do we think?
Where do thoughts get their inspiration from?
The answers to these questions will be explored in the next article.
Jayant Joshi
Jeevanvidya Mission
*जसा विचार तसा आकार.*
विचारांचा नैसर्गिक गुणधर्म आकाराकडे सरकण्याचा असतो. म्हणजेच आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन आकाराला येते. आपण जसे विचार करतो तसेच प्रत्यक्षात घडून येते.
विचार आकाराला कसे येतात ते बघणे खूपच मनोरंजक आहे.
शास्त्रज्ञ असं म्हणतात,
There is nothing other than vibrations. Everything in this universe is vibration. And you can create anything by way of vibration and you can destroy anything by viabration.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाच्या 126 व्या ओवी मध्ये म्हणतात,
या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
थोडक्यात सर्व वस्तूंमध्ये म्हणजेच ज्या दृश्य स्वरूपात आहेत, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा बघू शकतो किंवा ज्या अदृश्य स्वरूपात आहेत जसे की विचार आणि भावना ज्या केवळ आपण अनुभवू शकतो या सर्वांमध्ये केवळ आणि केवळ विविध पुनरावृत्ती स्वरूपात कंपन म्हणजेच चैतन्य अस्तित्वात आहे. सर्वत्र चैतन्य शक्तीचा वावर आहे.
या कंपन्यांच्या पुनरावृत्ती मध्ये - चैतन्य शक्ती मध्येबदल करता येणे शक्य आहे आणि म्हणूनच सद्गुरु म्हणतात,
*विचार बदला नशीब*
*बदलेल.*
मग सहाजिकच प्रश्न निर्माण होतो या विचारांना बदलायचे कसे?
विचार ही शक्ती आहे तसेच आपल्या इच्छा म्हणजेच भावना यादेखील शक्ती आहेत ज्यावेळी विचार व इच्छा यांच्या फ्रिक्वेन्सीज एकमेकांशी सुसंगत असतील तेव्हाच सूक्ष्माचे रूपांतर स्थुलात प्रत्यास येईल. म्हणजेच विचार आकाराच्या स्वरूपात प्रगट होतील.
अल्बर्ट आईन्स्टाईन चे प्रसिद्ध सूत्र आहे
E = mc2
याचा अर्थ असा
Energy = Matter
आणि Energy and matter are interconvertible.
E=Energy=Thoughts
उदाहरणार्थ मला धनवान व्हावयाचे आहे हा विचार म्हणजेच विचारशक्ती = स्थुक्ष्म शक्ती.
तर M=Matter=Material=
पैसा = स्थुल शक्ती.
Energy cannot be destroyed it can only be transformed.
या विश्वात सूक्ष्माचे रूपांतर स्थुलात आणि स्थुलाचे रूपांतर सूक्ष्मात असे चक्र सतत कार्यरत असते.
तुम्ही मानवी ट्रान्समिशन टॉवर आहात.तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून सतत शक्तीचे प्रसारण करत असता. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील कशातही बदल घडवून आणायचा असेल तर तुम्ही विचार बदलून म्हणजेच चैतन्य शक्तीच्या पुनरावृत्तीचे कंपन बदलून बदल घडवून आणू शकता.
तुमचे आजचे विचार हेच तुमचे भविष्यातील जीवन घडवीत असतात.
ज्याचा तुम्ही सतत व जास्तीत जास्त विचार करता किंवा ज्यावर तुमचा अधिकाधिक फोकस असतो ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होते. तुमचे विचार आकारात बदलतात.
तुमच्या विचारांना ज्यावेळी भावनेची जोड मिळते त्यावेळी तुमचे विचार हे अधिक शक्तिमान व ताकदवान होतात आणि या विचारांना गती प्राप्त होते.
मग विचार म्हणजे काय?
विचार कोण करतं?
आपण विचार कसा करतो?
विचारांना प्रेरणा कुठून मिळतात?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील लेखात पाहू.
जयंत जोशी
जीवनविद्या मिशन
Comments