top of page
कहाणी १९ डोळे-प्रकाशाचे दरवाजे नजर, दृष्टी, आणि पाहण्याची कला
*कहाणी १९* *डोळे - प्रकाशाचे दरवाजे* नजर, दृष्टी आणि पाहण्याची कला आपण डोळ्यांनी जग पाहतो. सूर्योदय पाहतो. माणसे पाहतो. रंग पाहतो. स्वप्ने पाहतो. पण कधी शांतपणे विचार केला आहे? *पाहणे आणि बघणे एकच असते का?* *बघणे ही डोळ्यांची क्रिया असू शकते… पण पाहणे ही जाणीवेची प्रक्रिया असते.* म्हणूनच: नजर बाहेर पाहते… पण दृष्टी अर्थ पाहते. कधी कधी माणूस समोरच्याला बघतो; पण त्याचे दुःख पाहत नाही. डोळे उघडे असतात… पण दृष्टी जागी नसते. कदाचित म्हणूनच काही लोक डोळे असूनही आंधळे असतात… आणि काह
JAYANT JOSHI
Jun 84 min read


कामावर प्रेम केले की काम सेवा होते सेवेवर प्रेम केले की सेवा साधना बनते
थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ, परमपूज्य सद्गुरू पै माऊली आणि मातृतुल्य माई यांना प्रथम *शिरसाष्टांग दंडवत.* आदरणीय प्रल्हाद दादा, तसेच दादांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या मिलन वहिनी यांना *कृतज्ञतापूर्वक नमस्कार*. समस्त पै कुटुंबियांना *प्रेमपूर्वक नमस्कार.* उपस्थित विद्यमान विश्वस्त, अनुभवी विश्वस्त, पदाधिकारी, प्रचारक, प्रसारक, प्रबोधनकार, कार्यकर्ते, समस्त नामधारक आणि उपस्थित ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती — या सर्वांना माझा *आदरपूर्वक नमस्कार.* विठ्ठल विठ्ठल! माझ्य
JAYANT JOSHI
Jun 58 min read


कहाणी १६ स्नायू-वापरा नाहीतर गमवा शक्ती, श्रम आणि जीवनाची पकड
* शरीरातील स्नायू आपल्याला एक कठोर पण अत्यंत महत्त्वाचे सत्य शिकवतात — “*वापरा नाहीतर गमवा.*” निसर्ग कोणतीही गोष्ट निष्क्रिय ठेवत नाही. वापरले नाही तर शक्ती कमी होऊ लागते. स्नायू कमकुवत होतात, हालचाली मंदावतात आणि शरीराची पकड सैल होऊ लागते. कधी कल्पना केली आहे? *आपल्या शरीरात किती स्नायू कार्यरत असतात?* आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल की मानवी शरीरात ६०० पेक्षा अधिक स्नायू असतात. आपण घेतलेला प्रत्येक श्वास, टाकलेले प्रत्येक पाऊल, प्रत्येक हास्य, अगदी डोळ्यांची उघडझापसुद्धा स्ना
JAYANT JOSHI
Jun 45 min read
मार्कशीट - टक्के-टोणपे की जीवनाचं शिक्षण?
सध्या निकालांचा सीझन सुरू आहे. दहावीचा निकाल… बारावीचा निकाल… घराघरांत उत्सुकता, आनंद, फोन, मेसेजेस, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!* *त्यांच्या मेहनतीला,* *चिकाटीला आणि पालक-*शिक्षकांच्या सहकार्याला* *मनापासून सलाम.* पण हीच वेळ आहे — फक्त निकाल साजरा करण्याची नाही, तर निकालाचं परीक्षण करण्याचीही. कारण आज निकाल पाहताना एक प्रश्न अस्वस्थ करतो — *आपण खरोखर अधिक शिक्षित होत आहोत का…* *की फक्त अधिक टक्केवारी मिळवत आहोत?* आज ९५%, ९८%, ९९
ME Holistic Centre
May 134 min read
माता ते माऊली… जन्म नव्हे, सर्वसमावेशकतेचा प्रवास
*मातृदिनाच्या सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा…! 🌸* जन्म देणाऱ्या मातांना… संस्कार देणाऱ्या मातांना… स्वतः झिजून दुसऱ्यांना फुलवणाऱ्या मातांना… आणि “सर्व माझेच आहेत” या भावनेने जगणाऱ्या प्रत्येक माऊलीला विनम्र प्रणाम. आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नाही. आई म्हणजे जी दुसऱ्याला स्वतःचा भाग मानते. म्हणूनच मातृत्वाचा खरा सौंदर्यबिंदू जन्म देण्यात नाही; तो सामावून घेण्यात आहे. आई आपल्या लेकराकडे “वेगळा जीव” म्हणून पाहत नाही. तिच्यासाठी लेकराचं दुःख म्हणजे स्वतःचं दुःख, लेकराच
ME Holistic Centre
May 102 min read
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन:* *मातीचा अभिमान, श्रमांचा सन्मान*
* १ मे हा दिवस महाराष्ट्रासाठी केवळ दिनदर्शिकेवरील एक दिवस नाही. हा दिवस आहे — अस्मितेचा, कृतज्ञतेचा आणि जबाबदारीचा. एका बाजूला १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र; आणि दुसऱ्या बाजूला असंख्य श्रमिकांच्या घामातून उभी राहिलेली मानवसंस्कृती. म्हणूनच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे दोन वेगळे दिवस वाटले, तरी त्यांचा आत्मा एकच आहे — मातीचा सन्मान आणि श्रमाचा गौरव. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐतिहासिक संघर्षातून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अ
ME Holistic Centre
May 13 min read


सीता नवमी: एक आत्मचिंतन, एक दर्पण — मेरी जन्म तिथि:
हरिओम 🙏 आज सीता नवमी की पावन तिथि है… और तिथि के अनुसार, यह मेरा जन्मदिवस भी है। Jyotish Shastra का अध्ययन करते हुए एक बात गहराई से समझ में आती है— कि हर तिथि केवल एक कैलेंडर की तारीख नहीं होती, बल्कि एक विशेष ऊर्जा, एक विशेष भाव और संदेश को लेकर आती है। जीवन को थोड़ा ध्यान से देखें, तो यह स्पष्ट होता है कि कुछ अनुभव बार-बार हमें कुछ सिखाते हैं और सत्य की ओर ले जाते हैं। कभी परिस्थितियाँ ऐसी बनती हैं कि व्यक्ति को अकेले रहना पड़ता है। बाहर से देखने पर यह केवल “अकेले रहना” ही
ME Holistic Centre
Apr 253 min read
अक्षय तृतीया : सोने घ्यायचे की जीवन अक्षय करायचे?*
* एका कलशातून सुवर्णमुद्रा… आणि दुसऱ्या कलशातून अक्षय दान जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त साजरे करण्यासाठी नसतात; ते स्वतःकडे नव्याने पाहण्यासाठी असतात. आजचा दिवस तसाच आहे. आज अक्षय तृतीया. *अक्षय तृतीयेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!* अक्षय तृतीया म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर एक परिचित चित्र उभे राहते — एक सुवर्ण कलश, आणि त्यातून झरत असलेल्या सुवर्णमुद्रा. समृद्धीचे, धनलाभाचे आणि शुभारंभाचे ते प्रतीक आहे. परंपरेत त्याला स्थान आहेच. पण आजच्या काळात या चित्राला अजून एक
ME Holistic Centre
Apr 192 min read
काळाच्या पलीकडे घुमणारा स्वर -* *आशा भोसले*
*मरावे परी कार्यरूपे उरावे - एका अजरामर स्वराला अभिवादन* माणसं जग सोडून जातात; पण काही माणसं जग सोडून गेल्यानंतरही कार्यरूपाने जगासोबतच राहतात. त्यांचा स्वर, त्यांचा आवाज, त्यांची निर्मिती, आणि जगाला त्यांनी अर्पिलेली देणगी — पिढ्यान्पिढ्या जिवंत राहते, शाश्वत राहते. ** * * * * * * * * * * * * ** *आशा भोसले* यांचा स्वरही तसाच आहे. *आशा भोसले* हे नाव भारतीय संगीतविश्वात केवळ एका महान गायिकेचे नाव नाही; ते असंख्य भावनांना स्वर देणाऱ्या एका अद्वितीय परंपरेचे नाव आहे. ८ सप्टेंबर
ME Holistic Centre
Apr 163 min read


बाबासाहेबांचे स्वप्न:* *पूर्णत्वासाठी जबाबदारी कोणाची?*
समतेच्या प्रवासात बाबासाहेबांचे महान कार्य, आजचे वास्तव आणि पुढील पिढीची जबाबदारी १४ एप्रिल आला की आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेची, आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानाची आठवण काढतो. पण या स्मरणाबरोबरच मनात एक प्रश्नही उभा राहतो—बाबासाहेबांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत आज कितपत घडला आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते. ते संपूर्ण भारताला नवी दिशा देणारे विचारपुरुष होते
ME Holistic Centre
Apr 154 min read


राम का पूजला जातो?
*रामनवमीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!* राम पूजला जातो कारण त्याच्या आयुष्यात प्रश्न नव्हते म्हणून नाही, तर प्रश्नांच्या ज्वाळांतही त्याने सत्यनिष्ठा, संतुलन, कर्तव्यबुद्धी, मर्यादा आणि चारित्र्य जपले म्हणून. प्रारब्धाने प्रसंग घडवले असतील, पण त्या प्रसंगांना दिलेले त्याचे उत्तर हा पुरुषार्थ होता. म्हणूनच राम आपल्याला शिकवतो — समस्या प्रत्येकाच्या जीवनात असतात; प्रश्न एवढाच असतो की आपण समस्येचा भाग होतो की समाधानाचा. श्रीराम जय राम जय जय राम विस्तृत लेख ✍🏼👇🏼 *रा
ME Holistic Centre
Mar 285 min read


सनसनीचा मोह… आणि मनाचे शिक्षण
सुजाण नागरिकत्वाची आजची खरी परीक्षा आजकाल एक नवीन सवय लागली आहे. मोबाईलवर काहीतरी धक्कादायक दिसले की बोट लगेच Forward वर जाते. क्षणभर थांबून विचार करण्याची सवय मात्र जणू delete झाली आहे. ⸻ आज मोबाईल उघडला की काही ना काही भडक, धक्कादायक, उत्तेजक मजकूर समोर येतो. एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट, एखादा दावा— आणि काही क्षणांतच तो शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो. कधी कधी काही लोकांचा मोबाईल पाहिला की वाटते— त्यांच्या हातात फोन नाही, तर जणू खरे-खोटे शहानिशा न करता माहिती पुढे
ME Holistic Centre
Mar 284 min read


लहानपण देगा देवा… जीवनाच्या आनंदाकडे घरवापसी
आज वयाची ७१ वर्षे पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करताना मन नकळत थांबून मागे वळून पाहत आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर एक गोष्ट अधिक स्पष्टपणे जाणवते— *जीवनाचं खरं यश बाहेर किती मिळवलं यात नसतं; जीवन किती सजगतेने, किती प्रेमाने आणि किती सद्बुद्धीने जगलो यात असतं.* सद्गुरूंच्या सहवासातून, जीवनाच्या अनुभवांतून आणि अंतर्मुखतेतून आलेल्या या जाणिवेतून खालील चिंतन सुचले. लहानपणी आनंदासाठी कारण लागत नव्हतं. हसू सहज यायचं. धावावंसं वाटायचं. एखादं फुल, एखादा पाऊस, एखादा फुगा—आणि मन फु
ME Holistic Centre
Mar 286 min read


राम का पूजला जातो?
कारण त्याच्या आयुष्यात प्रश्न नव्हते म्हणून नाही… तर प्रश्नांच्या ज्वाळांतही तो संतुलित राहिला म्हणून रामनवमी आली की आपण भक्तिभावाने *जय श्रीराम* म्हणतो. भारतातील जवळजवळ प्रत्येक प्रांतात आणि अनेक परदेशांमध्येही रामाचे पूजन केले जाते. मग एक प्रश्न सहज मनात येतो — राम सर्वत्र इतका पूजला जातो, ते का? तो देव होता म्हणून? तो राजा होता म्हणून? रावणाचा पराभव केला म्हणून? की आयुष्यातील भीषण प्रसंगांच्या वादळातही त्याने अंतर्मनाचे संतुलन, मर्यादा आणि सत्यनिष्ठा जपली म्हणून? श्रीराम ज
ME Holistic Centre
Mar 265 min read


गुढीपाडवा : केवळ नववर्ष नव्हे, तर जीवनाशी नव्याने जुळून घेण्याचा दिवस
शहनाईचे मंगलमय सूर… दाराशी उभारलेली गुढी… रंगांनी खुललेली रांगोळी… कडुनिंब-गुळाची तुरट-कडवट चव… नव्या वस्त्रांचा मंद सुगंध… आणि आसमंतात कुठूनतरी तरळत येणारे गीतरामायणाचे स्वर… गुढीपाडव्याची सकाळ अशीच काहीशी उगवते — फक्त घरात नाही, मनातही. लहानपणी या दिवसाचं आकर्षण वेगळंच असायचं. घरातली लगबग, अंगणातली स्वच्छता, आईच्या हातची तयारी, दाराशी उभी राहणारी गुढी, कडुनिंब-गुळाची चव, नव्या कपड्यांचा आनंद… तेव्हा एवढंच जाणवायचं — आजचा दिवस काहीतरी खास आहे. मोठं झाल्यावर कळायला लागतं — हो
ME Holistic Centre
Mar 194 min read
सद्गुरू महिमा अगाध* कुल-जात-विद्या-धनापलीकडे… जीवनाला दिशा देणारे सहावे तत्त्व—सद्गुरू
“In Indian culture, the Guru is the thread—subtle but strong— that guides a student through the maze of life.” भारतीय संस्कृतीत “गुरु” ही केवळ श्रद्धेची संकल्पना नाही; ती जीवन चालवण्याची कला आहे. कारण आयुष्य हे सरळ रेषेसारखं नसतं. ते वळणं घेतं, कधी धुक्यात जातं, कधी निर्णयांच्या चौकात उभं करतं. अशा वेळी माणसाला सर्वांत जास्त गरज असते ती—दिशेची. आणि दिशा देणारी हीच सूक्ष्म पण मजबूत “दोरी” म्हणजे गुरुतत्त्व. आपण अनेकदा म्हणतो, “सगळं आहे.” कुल आहे, परंपरा आहे, शिक्षण आहे, नाती आ
ME Holistic Centre
Mar 85 min read


जग डोक्यावर नको!* जीवन म्हणजे मोकळा श्वास
“मला यात काय मिळणार?” हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात पटकन उगवतो. आणि तो चुकीचा आहे असंही म्हणता येणार नाही. कारण आपण जिवंत आहोत—म्हणून सुरक्षितता हवी असते, स्थैर्य हवं असतं, मान-सन्मान हवा असतो. स्वतःचं भलं पाहणं हा दोष नाही; तो मानवी स्वभाव आहे. पण मग एक वेगळाच प्रश्न हळूच पुढे येतो— आज सर्वत्र *मी, मी, माझे* हा विचार इतका का बळावत चालला आहे? माणूस *मी* च्या पलीकडे विचार करताना कमी का दिसतो? कधी “मी”पासून “आम्ही”पर्यंत पोहोचतो, पण “सर्व”पर्यंत जाणं दूरच का वाटतं? याच प्रश्न
ME Holistic Centre
Mar 84 min read


अभिषेक शिवलिंगावर नव्हे, अहंकारावर करण्याची रात्र* *महाशिवरात्र — जीवाचा शिवाकडे प्रवास* आत्मलिंगावर अभिषेक म्हणजे ‘मी’ स्वच्छ करून शिवत्व जागवणे
महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास, अभिषेक आणि जागरणाची रात्र आहे का? की ती स्वतःला पुन्हा ओळखण्याची एक दुर्मीळ संधी आहे? शिव मंदिरात सापडतो की मनाच्या शांततेत? अभिषेक शिवलिंगावर करायचा की अहंकारावर? महाशिवरात्रीचा खरा अर्थ समजला की जाणवतं — शिव शोधायचा नसतो… तो जागा करायचा असतो. *महाशिवरात्र म्हणजे काय?* भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ उत्सव नसतात; ते जीवन समजून घेण्याची संधी असतात. प्रत्येक सण माणसाला थांबवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो. महाशिवरात्र ही अशीच एक अंतर्मुख करणारी रात्र आ
ME Holistic Centre
Mar 83 min read


उपवास* *भूक नाही… विवेक जागवणारी विश्रांती* हलके पोट — जागे मन — शहाणपणाकडे जाणारा मार्ग
आज महाशिवरात्र. अनेकांनी आज उपवास धरलेला आहे. पण *उपवास म्हणजे नेमकं काय?* सकाळपासून घराघरात तयारी सुरू — साबुदाणा खिचडी, रताळ्याचा किस, गोड रताळ्याच्या चकत्या, राजगिरा लाडू, बटाट्याच्या काचऱ्या, शिंगाड्याचा किंवा राजगिऱ्याचा शिरा… सोबत ताक, लस्सी, नारळपाणी, वेगवेगळी फळं, खजूर… हे सगळं बघितल की नकळत मनात हसू येतं— *एकादशी… आणि दुप्पट खाशी !* हा उपवास आहे का? की फक्त अन्नाचा प्रकार बदललेला असतो? हा प्रश्न कुणाची टिंगल करण्यासाठी नाही. कारण आपण सगळेच कधीतरी असा उपवास करत असतो.
ME Holistic Centre
Mar 84 min read


विकासाला विवेकाची जोड हवी* विवेकाशिवाय विकास म्हणजे भकास
आजकाल भारतामध्ये सर्वत्र “विकास” हा शब्द जणू मंत्रासारखा ऐकू येतो. नवनवीन महामार्ग, फ्लायओव्हर, औद्योगिक वसाहती, उंच इमारती, शहरांची अनियंत्रित वाढ—या सगळ्याला विकासाचं गोंडस नाव दिलं जातं. पण प्रश्न विकासाचा नाही. प्रश्न आहे तारतम्याचा. कारण विकासाचा वेग वाढला, पण विवेकाचा लगाम सैल झाला की प्रगती भकास रूप धारण करते. आणि हे आज आपल्या सभोवताली स्पष्ट दिसत आहे. ज्या नद्या पूर्वी बारमाही वाहत होत्या त्या आज कोरड्या पडत आहेत. नदीकाठ काँक्रिटमध्ये अडकत आहेत. जंगलांची अनियंत्रित तो
ME Holistic Centre
Mar 83 min read
bottom of page

