माँ / आई
- ME Holistic Centre
- 13 minutes ago
- 3 min read
माँ — निःस्वार्थ प्रेम की खुशबू और त्याग का दीपक
दिनभर की भागदौड़ के बाद शाम की हवा आंगन में घूम रही थी। आसमान में केसरिया रंग घुल गया था, और एक छोटे से घर में चूल्हे पर चावल पक रहे थे। घर की चौखट पर एक वृद्ध स्त्री बैठी थी—आँखों में ममता, माथे पर यादों की रेखाएँ, और मन में बच्चों की हज़ारों कहानियाँ। वह मुकुंद की माँ थी।
जब मुकुंद छोटा था, माँ की गोद में सोते हुए वह कहता, “माँ, तेरा हँसना कितना प्यारा है!” माँ बस हल्की-सी मुस्कुराती और उसके पीठ पर हाथ फेरती। उसकी नजरों में प्रेम की नमी होती, जो बिना बोले अनगिनत भावनाएँ कह जाती।
जीवन आगे बढ़ता गया। मुकुंद बड़ा हुआ, पढ़ा, और नौकरी की दौड़ में दौड़ने लगा। माँ को फोन करने का विचार आता, लेकिन काम की व्यस्तता में वह विचार कहीं खो जाता। माँ फिर भी, रोज़ उसकी याद में भगवान के सामने दीपक जलाती, तुलसी को पानी देती, और अपनी ममता की नमी में उसके लिए प्रार्थना करती—“मेरे बेटे को सुख मिले।”
और फिर एक दिन, एक पत्र ने मुकुंद के जीवन की दिशा बदल दी—माँ बीमार है। वह सब कुछ छोड़कर गाँव भागा। घर की चौखट पर बैठी माँ थकी हुई दिख रही थी, लेकिन चेहरे की मुस्कान वैसी ही थी—वही, जो बचपन में उसे शांत नींद देती थी। मुकुंद ने माँ का हाथ पकड़ कर कहा, “माँ, तुम्हारे बिना कुछ भी पूर्ण नहीं लगता।”
माँ बस मुस्कुरा दी। वह कुछ नहीं बोली—क्योंकि उसका प्रेम शब्दों में नहीं, बल्कि स्पर्श में, नजरों में और ममता की नमी में व्यक्त होता है।
माँ मतलब परिवार की साँस,माँ मतलब त्याग का दीपक,और माँ मतलब निःस्वार्थ प्रेम की सुगंध।
हमें माँ का सम्मान सिर्फ मदर्स डे पर नहीं, बल्कि हर दिन करना चाहिए—उसके त्याग का, उसके प्रेम का, और उसके अस्तित्व का।
माँ जैसा कोई दैवत इस संसार में नहीं।
जयंत जोशी
.....
आई—निस्वार्थ प्रेमाचा सुगंध आणि त्यागाचा दिवा
दिवसभराच्या घाईगर्दीत संध्याकाळचा वारा अंगणात फेर धरत होता. आभाळात केशरी रंग मिसळला होता, आणि एका छोट्या घरात चुलीवर भात शिजत होता. घराच्या ओसरीवर एक वृद्ध स्त्री बसली होती—डोळ्यांत माया, कपाळावर आठवणींच्या रेषा, आणि मनात लेकरांच्या हजारो कथा. ती मुकुंदची आई होती.
मुकुंद लहान असताना, आईच्या कुशीत झोपत असताना तिला म्हणायचा, आई, तुझं हसू किती गोड आहे! आई फक्त मंद हसायची आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवायची. तिच्या नजरेत प्रेमाचा ओलावा होता, न बोलता अनेक भावना सांगणारा.
जीवन पुढे सरकत गेलं. मुकुंद मोठा झाला, शिकला, नोकरीच्या शर्यतीत धावू लागला. आईला फोन करायचा विचार मनात यायचा, पण कामाच्या व्यापात तो विचार तसाच विरला जायचा. ती मात्र, रोज त्याच्या आठवणीने देवासमोर दिवा लावत होती, घराच्या तुळशीला पाणी घालत होती, आणि आपल्या मायेच्या ओलसर भावनेत त्याच्यासाठी प्रार्थना करत होती—माझ्या लेकराला सुख लाभो.
आणि एक दिवस, एका पत्राने मुकुंदच्या जीवनाचा वेग बदलला—आई आजारी आहे.तो सगळं सोडून गावाकडे धावला. घराच्या ओसरीवर बसलेली आई, थकलेली दिसत होती, पण चेहऱ्यावरचं हास्य तसंच होतं—तेच, जे लहानपणी त्याला शांत झोप देत होतं. मुकुंद आईचा हात हातात घेत म्हणाला, आई, तुझ्याशिवाय काहीच संपन्न वाटत नाही.
आई फक्त हसली. ती काहीच बोलली नाही—कारण तिचं प्रेम शब्दांत व्यक्त होत नाही, ते फक्त स्पर्शात, नजरेत आणि मायेच्या ओलसर भावनेत व्यक्त होतं.
आई म्हणजे कुटुंबाचा श्वास, आई म्हणजे त्यागाचा दिवा, आणि आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा सुगंध. आपण तिला फक्त मातृदिनाच्या निमित्ताने नाही, तर प्रत्येक दिवशी तिच्या मोलाचा, तिच्या त्यागाचा आणि तिच्या प्रेमाचा सन्मान केला पाहिजे.
🌸💖 आईसारखे दैवत या जगतामध्ये नाही.
जयंत जोशी
जीवनविद्या मिशन
Comentarios