top of page

वटसावित्री* *निमित्त एका* *वडाचे मनोगत*

L

तो एक वड निघून गेला l

सोबत हजार पारंब्या घेऊन l

पारंब्या नव्हत्या केवळ कल्पना l

त्या होत्या हजार नव्या संसाराच्या वलग्ना l

ज्यात होते अनेकांचे संसार स्वप्न ll


म्हणे मी,

एकाच्या बदल्यात रोप लावलीत ना पाच l

म्हणे मला नव जंगल उभारायचं l

ज्यात ना छाया, न चिमण्या, न पावसाची चाहूल! II


अशी कशी रे माणसा तुझी बुद्धी l

ज्याने हरपणार आहे तुझीच शुध्दी l विकासाच्या नावानं हरितसृष्टीचा संहार l वृक्ष गेले तरी वृत्ती राहिल्या...

हृदय मात्र बेकार l

केव्हा रे, माणसा तू शहाणा होणार? ll


झाडे लाव, नक्कीच लाव, l

पण आधी झाडे वाचीव, l

कारखाना उभारणं सोपं l

होता उद्ध्वस्त एक कारखाना l

हजारो कुटुंबांची उडते झोप l *विकासाला*

*हवीच*

*विवेकाची जोड ll*


*शहाणपण हाच*

*नारायण*

हा संदेश सद्गुरु पैं चा मार्ग सोपा जीवन जगण्याचा l

तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या l

हा मंत्र सुखी जीवनाचा ll


*क्रिया तशी*

*प्रतिक्रिया*

हे विसरू नकोस l प्रतिक्रिया घडल्यावर मात्र रडू नकोस l नशिबाला आपल्या दोष देऊ नकोस l

*तूच आहेस*

*शिल्पकार तुझ्या*

*जीवनाचा*

हे नित्य स्मरण हाच आधार सुखी आयुष्याचा ll


  • Jayant Joshi

 
 
 

Recent Posts

See All

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page