थांबायचे कुठे / Where Should One Stop?
- ME Holistic Centre
- 2 days ago
- 6 min read
सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,
*माणसाला थांबायचे*
*कुठे हे समजले*
*पाहिजे*.
खरोखरच जीवनात सुख समृद्धी आणि आनंद मिळवायचा असेल तर माणसाला थांबायचे कुठे याचे शहाणपण असणे आवश्यक आहे.
आपल्या सगळ्यांनाच राजा आणि एक लोभी माणूस यांची गोष्ट माहित आहे. राजा त्या व्यक्तीला सांगतो, "तू जेवढ्या अंतर जाशील तेवढी जमीन तुझी, पण अट एकच की सूर्यास्तापर्यंत येथे परत यावयास हवे" तो माणूस खूप अंतर जातो आणि सूर्यास्तापर्यंत परत येण्याचे अटीमुळे जीव तोडून माघारी पळतो आणि मध्येच अतिश्रमाने कोसळतो आणि जीव गमावतो. लोभामुळे कुठे थांबले पाहिजे हेच त्याच्या लक्षात येत नाही.
आमची आजची परिस्थिती त्या लोभी माणसा सारखीच झालेली आहे. आज आम्ही अधिकाधिक मिळवण्यासाठी सतत धावत आहोत. कुठेतरी थांबले पाहिजे हेच आज आमच्या लक्षात येत नाही. त्याच्या शहाणपणच आज आम्हाला नाही. आणि सरते शेवटी जे काही मिळवलेले आहे त्याचा उपभोग घेण्याचेच राहून जात आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या ४ थ्या अभंगात म्हणतात,
भावेंवीण भक्ति भक्तीविण मुक्ती l
बळेवीण शक्ती बोलू नये l१
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरितl
उगा राहें निवांत शिणसी वायां ll २ ll
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं l
हरीसि न भजसी कवण्या गुणे ll ३ ll
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें l
तुटेल धरणें प्रपंचाचें ll ४ ll
आम्ही नित्यनेमाने हरिपाठाची उपासना करतो. पण आम्ही सहसा कधीच हरिपाठचा अभ्यास करत नाही. वास्तविक पाहता हरिपाठ हा उपासनेचा ग्रंथ आहे की अभ्यासाचा ग्रंथ आहे ? हे देखील आम्ही जाणून घेत नाही. सर्वच ग्रंथ अभ्यासाचे नसतात तसेच सर्वच ग्रंथ हे उपासनेचे नसतात मात्र काही ग्रंथ हे उपासनेचे आणि अभ्यासाचे देखील असतात. हरिपाठ हा अभ्यासाचा आणि उपासनेचा असा दोन्ही साठीचा ग्रंथ आहे. हरीपाठाची उपासना केली पाहिजे त्याचबरोबर हरिपाठाचा अभ्यास देखील केलाच पाहिजे. कां करायचा हरिपाठचा अभ्यास ? यासाठी आपल्याला हरिपाठाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे.
भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती आहे आणि खरोखरच भारतीय संस्कृती ही महान संस्कृती आहे. अशा या महान संस्कृतीमध्ये आमचा जन्म झाला आहे. आपण धन्य आहोत. आपला जन्म कृतार्थ झाला आहे. भारतीय संस्कृती ही विश्वात्मक आहे. *वसुधैव कुटुंबकम* ही आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. *हे विश्वचि माझे घर.* संपूर्ण विश्व हे माझे कुटुंब आहे अशी आमची विचारधारा आहे. अशा या विश्वात्मक घराचे देवघर निःसंशय आपली भारतभूमी आहे. घराला जे घरपण प्राप्त होते ते त्या घराच्या देवघरामुळे. भारताला विश्वरुपी घराचे देवघर करण्याचे कार्य या भरतवर्षा मधल्या सगुण अवतारातील आचार्यांनी आणि संतांनी केलेले आहे. या संतांचे संत, संतांचे मुकुटमणी, संतांची माऊली जर कोण असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. *ज्ञानदेव माऊली* म्हणून संतांनी त्यांचा उदंड गौरव केलेला आहे. माऊलींचे चरित्र ज्यांनी लिहीलं ते नामदेव महाराज म्हणतात,
*ज्ञानराज माझी*
*योग्यांची माऊली*
*जेणे निगमवल्ली प्रगट*
*केली.*
निगम म्हणजे वेद आणि वल्ली म्हणजे शाखा किंवा विस्तार. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांचे ज्ञानाचा ज्ञानेश्वरीचे रूपाने विस्तार केला आणि वेदांचे गुढ तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसाठी उलगडून सांगितले म्हणूनच नामदेव महाराज माऊलींना *ज्ञानराज* संबोधतात.
सेना महाराज जे माउलींच्या समकालीन आहेत ते म्हणतात,
*विष्णूच अवतार सखा*
*माझा ज्ञानेश्वर*
*ज्ञानेश्वरांच्या चरणी*
*सेना आला लोटांगणी*.
ज्ञानेश्वर माऊलींनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी अतिशय सुंदर अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. भगवद्गीता जी संस्कृत मध्ये असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडची होती ते ज्ञान सर्वसामान्य जनांना समजावं म्हणून ज्ञानदेवांनी गीता मराठी मध्ये लिहिली ती *ज्ञानेश्वरी.* माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ती *कर्मयोग्यांसाठी.* ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले तू सर्वसामान्यांना गीतेचे ज्ञान व्हावे म्हणून ज्ञानेश्वरी लिहिलीस, पण या ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं तेच तू मराठीत सांगितल आहेस, यात तुझ्या अनुभवाचे बोल कुठे आहेत? म्हणून ज्ञानदेवांनी *अनुभवामृत* लिहिलं ते *ज्ञानयोग्यांसाठी.* जेव्हा ज्ञानेश्वरीचा पूर्ण अभ्यास होतो, ज्ञानेश्वरीच संपूर्ण आकलन होतं तेव्हा संत ज्ञानेश्वरांचा *अमृतानुभव* कळायला लागतो.
चांगदेवांचं अंतरंग पालटण्यासाठी माऊलींनी *चांगदेव पासष्टी* लिहिली पण ती *ध्यानयोगांसाठी*. पण माऊलींच्या मनात आलं जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी काहीतरी विशेष लिहायला पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी अभंग संपदा निर्माण केली आणि त्याच्यामध्ये अत्यंत गोड असा *हरिपाठ* लिहिला. हरीपाठाचे केवळ २७ अभंग आहेत पण या २७ अभंगांमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचे सगळं सार सामावलेल आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाची निर्मिती ही काही केवळ उपासनेसाठी केलेली नाही. निवृत्ती नाथांनी जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी काहीतरी विशेष निर्मितीची आज्ञा केल्याने ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाची रचना केली आहे. सर्वसामान्य जनांना दैनंदिन जीवन सुखा समाधानाने, आनंदाने व्यतीत करण्यासाठी त्यांना जीवन जगण्याची कला प्राप्त व्हावी या उद्देशाने हरिपाठाची निर्मिती झाली आहे. या दृष्टिकोनातून आम्ही हरिपाठाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्गुरु म्हणतात, *जीवन जगणे ही एक कला आहे* आणि ती कला आम्ही सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी हरिपाठाचा अभ्यास हा अत्यंत उत्तम आणि सोपा मार्ग आहे. हरीपाठात नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. हे नाम कोणते? तर, जिथे आमचे मन एकाग्र होते ती कोणतीही गोष्ट म्हणजे नाम. हे नाम सहज असले तरी सोपे नाही. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. आणि नुसते नाम घेणे म्हणजे उपासना किंवा साधना नाही तर समजून उमजून सहजपणे नामाचे सतत जीवनातील दैनंदिन कामकाजात स्मरण होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने नामस्मरण आणि हरिपाठाची उपासना आहे.
हरिपाठाचा वरील दृष्टिकोनातून अभ्यास करण्याच्या दृष्टीने आपण हरिपाठातील ४ था अभंग आणि आमचे दैनंदिन जीवन याचा विचार करणार आहोत.
धन्यवाद.
सद्गुरुनाथ महाराज की जय.
जयंत जोशी
जीवनविद्या मिशन
---
Where Should One Stop?
Sadguru Shri Vamanrao Pai says,
“A person must understand where to stop.”
Truly, if one wishes to attain happiness, prosperity, and peace in life, they must have the wisdom to know where to stop.
We all know the story of the king and the greedy man. The king tells him, "As far as you go, the land will be yours, but on one condition – you must return by sunset." The man keeps going farther and farther, and due to the condition of returning before sunset, he runs back with great exhaustion. Eventually, he collapses midway due to overexertion and loses his life. Due to greed, he failed to understand where to stop.
Our current situation is quite similar to that greedy man. Today, we are constantly running in pursuit of more and more. We fail to realize that we must stop somewhere. We lack the wisdom to pause. As a result, even what we have earned remains unenjoyed.
In the fourth abhanga of the Haripath, the revered Saint Dnyaneshwar Mauli says:
> Without devotion, there is no true love,
Without strength, there is no power,
Don't speak without substance. (1)
How can the divine be pleased quickly
If you stay idle and wear yourself out meaninglessly? (2)
You put so much effort into worldly duties every day and night,
Yet you do not chant the name of Hari – what good is that? (3)
Dnyandev says: by chanting the name of the Lord,
The grip of worldly attachments will break. (4)
We worship Haripath regularly, but we rarely study it. Is Haripath a book of worship or of study? Many of us haven’t even tried to find that out. Not all scriptures are meant for worship, nor are all of them purely for study. But some, like Haripath, are meant for both – study and devotion.
So why should we study Haripath? For that, we must understand the background and purpose of this text.
Indian culture is Sanatan (eternal) – a truly great tradition. We are blessed to be born in such a profound culture. Ours is a universal culture, founded on the ideal of Vasudhaiva Kutumbakam – "The world is one family."
“This world is my home.” This is the mindset of our tradition. In this universal home, India is undoubtedly the altar. Just as a home is defined by its sacred space (altar), the saints and sages of India have made Bharat the spiritual altar of the world.
Among all saints, the crown jewel, the beloved Mauli (Mother) of all saints, is none other than Sant Dnyaneshwar. Hence, saints lovingly call him Dnyanadev Mauli. Saint Namdev, who wrote Dnyaneshwar’s biography, says:
> “Dnyanraj is my Lord,
The Mauli of all yogis,
Who revealed the branches of Vedic wisdom.”
Here, Nigam means the Vedas, and Valli means branches or expansion. Dnyaneshwar Mauli expanded Vedic wisdom through the Dnyaneshwari, making the hidden spiritual truths of the Vedas understandable for common people. That’s why Saint Namdev calls him Dnyanraj (King of Knowledge).
Saint Sena Maharaj, a contemporary of Mauli, says:
> “My friend Dnyaneshwar is none other than Vishnu's avatar;
At Dnyaneshwar’s feet, Sena bows down with reverence.”
To uplift the masses, Dnyaneshwar Mauli composed a treasure trove of scriptures. The Bhagavad Gita, originally in Sanskrit, was out of reach for most people. Mauli translated its essence into Marathi through the Dnyaneshwari, aimed especially at karma yogis (those on the path of action).
After completing the Dnyaneshwari, his Guru Nivruttinath said, "You have conveyed Krishna’s words to Arjuna in Marathi – but where is your own experience in it?"
Thus, Mauli wrote Amritanubhav – a text for jnana yogis (those on the path of knowledge).
When the Dnyaneshwari is deeply studied and understood, only then does the Amritanubhav (nectar-like experience) of Dnyaneshwar become accessible.
To transform Changdev’s inner being, Mauli wrote Changdev Pasashti – a text meant for dhyana yogis (those on the path of meditation). But Mauli also felt the need to write something specifically for the common person’s upliftment.
Thus, he created a treasure of abhangas (devotional verses) – among which the sweet and powerful Haripath holds a special place. Though it has only 27 abhangas, these verses contain the entire essence of Indian philosophy.
Dnyaneshwar Mauli didn’t write Haripath just for devotional practice. It was composed upon the command of Nivruttinath to serve the upliftment of ordinary people.
The aim of Haripath is to help people live their daily lives with peace, contentment, and joy, and to teach them the art of living.
Sadguru says, “Life is an art,” and we must master that art. Studying Haripath is a beautiful and effective way to do that.
Haripath elaborates the importance of Nam-Smaran (chanting the Divine Name).
What is “Naam”?
It is anything that focuses and centers the mind.
Though it sounds simple, it's not easy.
It requires practice and understanding.
Mere chanting isn't true worship or sadhana – but when the name becomes a natural remembrance in all aspects of life, in every task, that is true Nam-Smaran and true Haripath devotion.
With this understanding, we will now reflect on the 4th Abhanga of Haripath and its relevance to our daily life.
Thank you.
Sadgurunath Maharaj Ki Jai!
– Jayant Joshi
Jeevanvidya Mission
Comments