top of page

आजचा विचार: साध्य* *आणि साधन


आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही साध्य गाठायचं असतं,

कधी शांततेचं,

कधी यशाचं,

तर कधी भगवंताच्या सान्निध्याचं.


मात्र, आपण सतत केवळ साध्याचाच विचार करत राहतो .

“*कधी मिळेल?”*,*”का उशीर होतोय?”* *”हे मला का मिळत नाही?”*

आणि या चिंतेतच बऱ्याचदा मार्गच निसटून जातो.


🎯 *त्यामुळे लक्ष कुठे*

*केंद्रित करायचं?*

साध्यावर नव्हे… तर साधनांवर!

हो, साध्य गाठायचं असेल,

तर त्यासाठी लागणाऱ्या साधनांची शुद्धता, सातत्य आणि समर्पण आवश्यक आहेत.

🪔 संत तुकाराम महाराज म्हणतात:

*”साधनेविना साध्य नाही.”*

या एका ओळीतच अख्खं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.


🌸 *थोडक्यात, जीवनातील काही उदाहरणं:*

🔹 मनात शांती हवी?

* रोज काही क्षण

स्वतःसाठी राखून ठेवा.

* फालतू मोबाईल स्क्रोलिंग

थांबवा.

* मनाला थोडी शांतता द्या.


🔹 नात्यांत गोडवा हवा?

➤ ऐका… फक्त, बोला नाही.

➤ समजून घ्या… आणि

अपेक्षा थोड्या सोडून द्या.

➤ गरज असेल तरच आणि

तेव्हाच सल्ला द्या.


🔹 आयुष्यात समाधान हवंय?

➤ सेवा, साधना, समर्पण —

हेच खरे साधन.

➤ कृतीत भक्ती ठेवा,

➤ आणि फळाची अपेक्षा

नको — फळ वेळेवर

उमलतंच!

✨ *एक सूत्र मनात ठेवा:*

“साध्य मागू नका, साधन जोपासा, साध्य आपोआप तुमच्या जवळ चालत येईल.”


लेखन: जयंत जोशी

*दैनंदिन प्रेरणे साठी एक छोटीच पण खोल दिशा.*🙏

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page