नवरात्रोत्सव : तिसरा दिवस – चंद्रघंटा देवी
- ME Holistic Centre
- Sep 24
- 2 min read

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दुर्गाच्या माता चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते.
कपाळावर तेजस्वी अर्धचंद्र, जो घंटेसारखा झळकतो — म्हणून देवीचे नाव *चंद्रघंटा.*
सुवर्णमयी स्वरूप, दशभुजा स्वरूप, मात्र प्रतिमा अष्टभुजा, हातांत विविध शस्त्रं आणि वाहन — सिंह.
ही मुद्रा सांगते : *भीतीवर विजय मिळवा आणि न्यायाच्या बाजूने उभे राहा.*
*चंद्रघंटा म्हणजे भीतीवर विजय.* देवी साधकाला आठवण करून देते :
*भीती ही फक्त मनाचा भ्रम आहे.*
*धैर्यानं पाऊल टाकलं की भीती नाहीशी होते.*
देवी आश्वासक संदेश देते :
*भीतीला सामोरं जा. भीतीला तुझ्यावर राज्य करू देऊ नकोस, तू तिच्यावर विजय मिळव*
🦁 चंद्रघंटा देवीचे वाहन आहे सिंह-
सिंह म्हणजे धैर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक.
देवी सिंहावर आरूढ आहे — म्हणजेच ती शक्तीवर नियंत्रण ठेवते.
* सिंह शिकवतो : निर्भय हो,
पण विवेकासह.
* सिंहाची गर्जना म्हणजे
अन्यायाविरुद्धचा
आवाज.
* साधकासाठी संदेश :
*अन्याय सहन करू*
*नकोस; धैर्यानं उभं राहा*
*दहा हातांचा गूढार्थ*
चंद्रघंटा देवीचे दहा हात आणि त्या हातातील शस्त्रे हे फक्त अलंकार नाहीत; ते अंतर्गत शक्तींचं प्रतीक आहेत.
* त्रिशूल – राग, द्वेष, मोह
यांवर विजय.
* गदा – मानसिक आणि
शारीरिक दृढता.
* तलवार – विवेकाची धार,
अन्यायाविरुद्ध लढण्याची
ताकद.
* कमल-शुद्धता, अंतःशांती.
* बाण – लक्ष्यावर
तन्मयतेने लक्ष ठेवणं.
* धनुष्य – संयम आणि
योग्य क्षणी कृती.
* कमंडलु – साधना, संयम
आणि त्याग.
* घंटा – अज्ञानाचा अंधार
दूर करणारी चेतना.
* अभयमुद्रा – भीतीवर मात;
साधकाला संरक्षण.
* वरदमुद्रा – कृपा, दया
आणि सिद्धीचा वर.
ही दहा आयुधं म्हणजेच आपल्या अंतःशक्ती आहेत.
त्या जागवल्या की, भीती, राग, संभ्रम, अन्याय — यांचा पराभव सहज शक्य होतो.
🌿 आपल्या आयुष्यातील भीती आणि अन्यायाशी सामना करण्यासाठी आपल्याला याच दहा अंतःशक्ती हव्यात :
• विवेक (तलवार),
• धैर्य (सिंह),
• संयम (धनुष्य),
• शुद्धता (कमल),
• श्रद्धा (कमंडल)…
यांच्या आधारावर आपण आयुष्यातील कोणत्याही संकटांना सामोरं जाऊ शकतो.
🎨 आजच्या दिवसाचा रंग –
तिसऱ्या दिवशी पूजली जाणारी माता चंद्रघंटा ही धैर्य, शौर्य आणि न्यायाचं प्रतीक आहे.
रॉयल ब्ल्यू रंग तिच्या या सामर्थ्यशाली रूपाशी जुळतो,
“भीतीवर विजय मिळवण्यासाठी शांत पण अढळ धैर्याची गरज असते, आणि रॉयल ब्ल्यू रंग तेच प्रतीक करतो.”
🌸 संदेश
चंद्रघंटा देवी भक्तांना सांगते :
*भीती तुला थांबवेल पण धैर्याने तुला पुढे जायचं आहे.*
*सिंहासारखा निडर हो, आणि तुझ्या दहा अंतःशक्तींना जागव.*
*तेव्हाच जीवनात खरी विजयाची घंटा वाजेल.*
उद्या चौथा दिवस: कुष्मांडा देवी पूजन आणि रंग आहे पिवळा.










Comments