नवरात्रोत्सव :* *दिवस सहावा-कात्यायनी*
- ME Holistic Centre
- Sep 27
- 2 min read
🌸

आज नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस.
या दिवशी पूजली जाते *कात्यायनी देवी*— पराक्रम, धैर्य आणि सत्याच्या विजयाचं प्रतीक.
✨*कात्यायनी देवी कोण?*
पुराणकथेनुसार, महिषासुर दैत्याच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन देवतांनी आपली सर्व उर्जा एकत्र केली. या दिव्य संगमातून प्रकट झालं तेजस्वी, पराक्रमी आणि भयंकर रूप -*कात्यायनी.*
ऋषी कात्य यांच्या आश्रमात तिचं प्राकट्य झालं. त्यांनी सर्वप्रथम तिची पूजा केली म्हणूनच ती कात्यायनी म्हणून ओळखली जाते, कात्यायनी म्हणजे “ऋषी कात्यांची कन्या”.
कात्यायनी देवी महिषासुरमर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. तिने असत्य, अन्याय आणि अहंकाराचं प्रतीक असलेल्या महिषासुराचा वध केला.
*कात्यायनी देवीचे स्वरूप आणि वैशिष्ट्यं*
* चार हात :
* एका हातात तलवार —
अन्यायाचा नाश करणारी
शक्ती.
* एका हातात कमळ —
निर्मळता आणि
अध्यात्माचं प्रतीक.
* एक हात अभयमुद्रा —
भक्तांना निर्भयता देणारी
मुद्रा.
* एक हात वरदमुद्रा —
कृपा आणि आशीर्वाद
देणारी मुद्रा.
* वाहन : सिंह — निर्भयता,
धर्म आणि सामर्थ्याचं
प्रतीक.
* तेजस्वी रूप : शौर्य आणि
करुणेचा अद्भुत संगम.
🌿*देवी कात्यायनीच्या उपासनेचं महत्त्व*
कात्यायनी देवीची उपासना केल्याने —
* आयुष्यातील अडथळे दूर
होतात.
* रोग, शोक, भीती यांपासून
मुक्तता मिळते.
* आत्मविश्वास, धैर्य आणि
स्थैर्य वाढतं.
* भक्ताच्या मनात शांती,
एकाग्रता आणि करुणा
प्रकट होते.
*आधुनिक विज्ञान सांगते:*
देवी उपासना हा काही केवळ धार्मिक विधी नाही, तर आधुनिक विज्ञानाशीही तिचा खोल संबंध आहे:
* मनोविज्ञान सांगतं की
देवीचं धैर्यवान रूप स्मरण
करणं म्हणजे
Visualization
Therapy सारखं आहे.
यामुळे भीतीवर नियंत्रण,
आत्मविश्वासात वाढ
आणि मानसिक संतुलन
साधता येतं.
* न्यूरोसायन्स सिद्ध करतं
की मंत्रोच्चार आणि ध्यान
केल्याने मेंदूत अल्फा
वेव्हज निर्माण होतात.
यामुळे तणाव कमी होतो,
एकाग्रता वाढते आणि
सेरोटोनिन (आनंद देणारे
हार्मोन्स) स्रवतात.
* रंगशास्त्र (Color
Psychology) नुसार-
सहाव्या दिवसाचा रंग
राखाडी आहे. हा रंग
संतुलन, स्थैर्य आणि
तटस्थता देतो. काळा–
पांढरा यांच्या मध्ये
असलेला राखाडी रंग
आपल्याला समतोल
राखायला शिकवतो.
🌸*कात्यायनी देवी आपल्याला शिकवते-*
“भीतीवर विजय मिळव, अन्यायाला विरोध कर.धैर्य आणि संतुलन यांच्या आधारावरच खरा विजय शक्य आहे.”
*जयंत जोशी*










Comments