*मास्टर की…🗝️तुमच्याच हातात* मी 🔓 उघडून – सर्वांचं होण्यासाठी!
- ME Holistic Centre
- Sep 22
- 3 min read

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने
“शुभं करोति कल्याणम्” म्हणणाऱ्या
या मंगलदायक शक्तीच्या उपस्थितीत,
आज मी तुमच्यासमोर
एक अमूल्य, पुनःर्भेट घेवून आलो आहे. ती आहे
*Master Key*
होय एक Master KEY आणि साधीसुधी नाही तर
एक *Universal Master KEY.*
तुमच्याकडे आधीपासूनच आहे ही चावी —
पण आज ती पुन्हा पुनर्भेटीच्या निमित्ताने हातात द्यायचं काम करायचं आहे.
*”चांगलं” राहणं इतकं कठीण का वाटतं?*
आपण सगळेच…
कुणी तरी “चांगलं” वागावं, “चांगलं” घडावं, “चांगली” माणसं भेटावी — अशी अपेक्षा करत जगतो.
आपणही चांगले वागण्याचा, चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतो.
पण तरीही बऱ्याचदा असं का वाटतं,
की *या जगात चांगलं राहणं म्हणजे झगडणं*? चांगल राहणं वाटत तितक सोप नाही.
कधीकधी तर काही माणसं असंही म्हणतात –
*या जगात चांगलं राहणं अशक्य आहे…*
चांगल्या माणसांनाच नेहमी जास्त त्रास सहन करावा लागतो.
कारण आपल्या कल्पनेत “चांगलं” असणं म्हणजे –
नैतिकता पाळणं, दुसऱ्यांपेक्षा सरस असणं, नेहमी योग्य असणं,
किंवा स्वतःला सतत “सुधारण्याचा” प्रयत्न करणं…
…पण हे सगळं करताना
आपण अधिक थकतो, गोंधळतो, कधी कुरकुरतो…
आणि मग चांगुलपणाचं ओझंच वाटायला लागतं.
*मग काय करावं?*
सोप्पं आहे,
स्वतःचा विचार करताना —
फक्त “माझं” एवढंच पाहू नका —
कधीतरी “आपलं” असंही पहा…
वागताना —
एखादी कृती दुसऱ्याला त्रास देणार नाही ना —
हे हळुवारपणे स्वतःला विचारा.
आणि भावना ठेवताना —
फक्त आपल्या लोकांपुरत्याच नाही,
तर सगळ्यांसाठी ममत्व ठेवा…
अगदी त्यांच्यासाठीसुद्धा
जे तुमच्याशी सहमत नाहीत.
ही दिशा एकदा घेतली, की तुम्हाला वेगळंच जाणवायला लागतं.
“चांगलं” राहण्याचा प्रयत्न करण्याची गरजच उरत नाही.
कारण तुम्ही स्वतःच “सर्व समावेशक” होता.
आणि समावेशक विचारातून झालेली प्रत्येक कृती
आपोआप सर्वांच्याच भल्यासाठी घडते.
*पण आपल्यातच आहे एक अडथळा…*
अहंकार, मी पणा, माझे आणि माझ्यासाठी असा संकुचितपणा, स्वार्थ आणि वेगळेपणा…
…आणि हो, हा अडथळा,
दुसऱ्या कुणाला नाही — तर माझे मलाच दूर करावा लागणार आहे.
कारण,
तो दूर करण्याची चावी तर माझ्याच हाती आहे.
ही चावी वापरली की —
सगळ्यात आधी आपलं मनच उघडायला लागतं…
बंदिस्त मन हळूहळू मोकळं होतं,
आणि मग… आपण स्वतःसाठीच नाही, तर सर्वांसाठी उमलायला लागतो.
ही Master Key म्हणजेच *कृतज्ञता*—
*मी* पासून *आपणां* कडे आणि *सर्वांपर्यंत* जाणारं सोपान.
सद्गुरू आणि आदरणीय दादा नेहमी सांगतात —
*कृतज्ञता हीच सर्वात मोठी साधना आहे.*
आपल्या अस्तित्वासाठी,
जगण्याच्या संधीसाठी,
कुणाचं तरी ‘अदृश्य योगदान’ असतंच…
ते मान्य करणं,
आणि त्याबद्दल अंतःकरणपूर्वक नम्र होणं —
हीच खरी Transformation ची सुरुवात.
आणि या मास्टर Key चा Universal Pass code आहे.
सद्गुरूंची विश्वप्रार्थना —
*हे ईश्वरा,*
*सर्वांना चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे.*
*सर्वांना सुखात, आनंदात,* *ऐश्वर्यात ठेव.*
*सर्वांचं भलं कर, कल्याण*
*कर, रक्षण कर.*
*आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे…”*
ही प्रार्थना एक अद्भुत Master Universal Key आहे.
जी सगळ्याच्या पलीकडे म्हणजे — कोणत्याही जाती, धर्म, लिंग, वंश वा भाषेच्या पलीकडे जाऊन —
मन आणि जीवन उघडू शकते.
*मी* रूपी कुलूप उघडलं, की *आपण* उजळतो!
‘मी’ म्हणजे वेगळेपणाचं कवच… सीमांचा आभास.
हे कवच जेंव्हा आपण आतून उघडतो,
तेंव्हा आपण केवळ स्वतःचंच नव्हे,
तर सर्वांचं भलं घडवण्यासाठी पात्र होतो.
*हीच आहे खरी Master Key-*
*मी* उघडलं, की *आपण* उजळू लागतो.
आणि
🌟 मास्टर KEY तर तुमच्याच हातात आहे-
विचार करा… कसा आणि काय विचार करायचा?
कसं वागायचंय?
हे जीवन कसं जगायचंय?
फक्त स्वतःचा विचार करून?… की सर्वांचा?
कारण —
सर्वांमुळेच आहे *”मी”चं अस्तित्व.*
सर्वांमध्येच अंतर्भूत आहे *मी*
आणि
सर्वांसाठीच आहे *”मी”ची व्यवस्था*
असा हा सर्वांमधला मी गवसला की जीवनातील खऱ्या गणेश उत्सवाला सुरुवात.
पाहा… KEY तुमच्याच हातात आहे.
कुलूप उघडायचंय की नाही — हे तुमचं तुम्हीच ठरवायचंय.
कुलूप बंद — मर्यादित, गुदमरलेलं जीवन.
कुलूप उघडलं — विस्तीर्ण, विशाल, मोकळं आकाश.
✨ आता ठरवा, काय करायच ते … …
कारण,
*तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार!*
“जय गणेश, जय गणेश
जय गणेश देवा
माता ज्याकी पार्वती पिता महादेवा”
*हे गणेशा,*
*सर्वांना चांगली बुद्धी दे*
एक बुद्धी याचक:
*जयंत जोशी*










Comments