नवरात्रोत्सव दिवस ८ वा* *महागौरी देवी* : पावित्र्य, शांती आणि अंतःशुद्धीचा संदेश
- ME Holistic Centre
- Sep 29
- 1 min read
*

नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी महागौरी ही देवी म्हणजेच दैवी सौंदर्य, पावित्र्य आणि शांततेचं मूर्त स्वरूप. तिचं वर्णन असं केलं जातं — श्वेतवस्त्र परिधान केलेली, चार भुजा असलेली, वृषभावर आरूढ आणि चेहऱ्यावर निर्मळ तेज असलेली.
महागौरी ही पार्वतीचं तपश्चर्येनं उजळलेलं रूप मानलं जातं. “गौ” म्हणजे ज्ञान, गती, प्राप्ती आणि मुक्ती. म्हणूनच महागौरी — आपल्याला ज्ञान देते, जीवनाच्या मार्गावर पुढे नेत राहते, आवश्यक साधनं पुरवते आणि अखेरीस मोक्षाकडे घेऊन जाते. तिचं श्वेत रूप म्हणजे निर्मळ अंतःकरणाचं प्रतीक.
कथेनुसार, शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीनं घोर तपश्चर्या केली. त्यामुळे तिचं अंग काळं पडले. पण गंगेत स्नान केल्यानंतर ती अत्यंत शुभ्र आणि तेजस्वी झाली, आणि तिलाच महागौरी म्हटलं गेलं. हा संदेश स्पष्ट आहे — तप, संयम आणि अंतःशुद्धीमुळेच जीवनात खरं सौंदर्य आणि शांतता प्राप्त होते.
आजच्या वैज्ञानिक युगातही महागौरी पूजनामागे खोल अर्थ आहे.
* श्वेत रंगाचं मानसशास्त्र
सांगतं की पांढरा रंग मन
शुद्ध करतो, तणाव कमी
करतो आणि ध्यान एकाग्र
करतो.
* वृषभ वाहन स्थैर्य आणि
सहनशीलतेचं प्रतीक आहे
जीवनात सातत्य आणि
संयम यशाचं रहस्य
आहेत.
* शुद्धीकरणाची कथा
म्हणजेच आधुनिक भाषेत
डिटॉक्सिफिकेशन —
शरीर-मनातील
नकारात्मकता काढून
टाकल्याशिवाय खरा
तेजोमयपणा प्रकट होत
नाही.
* ध्यान आणि जपाच्या
वेळी श्वेत स्वरूपाची
कल्पना केल्याने मेंदूमध्ये
सेरोटोनिन व डोपामिन
स्रवतात, ज्यामुळे मन
शांत, आनंदी आणि
संतुलित होतं.
🌸
महागौरीचं पूजन म्हणजे फक्त पारंपरिक विधी नाही. तो आहे-
* आपल्या विचारांना स्वच्छ
करणं,
* जीवनात शांती आणणं,
* आणि अंतःकरणातलं
सौंदर्य ओळखणं.
महागौरीच रूप आपल्याला आठवण करून देतं :
👉 अस्सल सौंदर्य बाहेरचं नव्हे, तर अंतःशुद्धीचं आहे.
👉 शांती आणि आनंद हे अंतःकरण निर्मळ ठेवल्यानंच मिळतात.
🌼 नवरात्राचा आठवा दिवस सांगतो —
*मन शुद्ध करा, विचार स्वच्छ ठेवा, आणि जीवनात स्थैर्य आणा. अंतःशुद्धी म्हणजेच खऱ्या आनंदाचं रहस्य.*🌼
*जयंत जोशी*










Comments