top of page

अन्न : शरीराचं इंधन* सद्गुरू म्हणतात, *भूक लागलेली असताना* *खाल्लेल अन्न म्हणजे पूर्णब्रम्ह* *तर भूक न लागता खाल्लेल अन्न म्हणजे ब्रह्मराक्षस.*

ree

पूर्णब्रह्म आणि ब्रह्मराक्षस अस जे सद्गुरूंनी म्हटलेले आहे त्या संकल्पना समजण्यासाठी आपल्याला प्रथम अन्न आपण कशासाठी ग्रहण करतो हे समजून घेणे आवश्यक आहे.


रोजच्या जीवनात आपण आनंदी सुखी राहण्यासाठी अनेकविध गोष्टींचा विचार करतो. हे योग्यच आहे. पण मुळात ज्या गोष्टीवर इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत त्या मूळ गोष्टीलाच जर आपण विसरलो तर आपल्याला अपेक्षित परिणाम कसे मिळतील.


सद्गुरू म्हणतात,

*शरीर साक्षात परमेश्वर*

का व कसे हे आधी नीट समजून घेतले पाहिजे.


आपलं शरीर म्हणजे एक अद्भुत यंत्र आहे.

गाडी असो, मोटर असो किंवा कोणतंही यंत्र — ते चालण्यासाठी इंधन लागणारच.

इंधनाचं स्वरूप आणि दर्जा जसा असेल, तशी त्या यंत्राची कार्यक्षमता ठरते.

स्वच्छ इंधन टाकलं, तर इंजिन सुरळीत, शांत आणि ताकदीने चालतं.

निकृष्ट इंधन टाकलं, तरी इंजिन कसबस चालतं; पण धूर निघतो, आवाज होतो, आणि त्याचं / इंजिनच आयुष्य कमी होतं.


आपलं शरीरही याच नियमाला अपवाद नाही.

आपण रोज जे खातो, पितो — तेच या शरीराचं इंधन आहे.

म्हणूनच अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर जीवनाची ऊर्जा टिकवण्यासाठी आहे.


*प्रयोग करून पाहा…*

काय खावं, काय खाऊ नये याबाबत जगभर विविध मतं, सल्ले, डाएट प्लॅन्स फिरत असतात.

पण खरं सांगायचं तर कोणतीही बंधनं घालण्याची गरज नाही.

सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतः प्रयोग करून पाहा.

उदाहरणार्थ,

आज रात्री नेहमीचं शिजवलेलं जेवण न घेता फक्त फळं खा.तेही सूर्यास्तापूर्वी खाल्ल्यास उत्तम.

उद्या सकाळी तुम्हाला उठण्यासाठी गजराची घंटा लागणार नाही.

गजर वाजायच्या आधीच झोप आपोआप उघडते.

डोळे निस्तेज किंवा जडसर वाटत नाहीत,

उलट तुम्ही लगेच उठता —

ताजेतवाने, उजळलेले आणि पूर्ण सतर्क.


*अनुभवातून पटणारं सत्य*

हे असं एकदाच नाही, तर थोडे थोडे प्रयोग केले,

तर तुम्हाला हळूहळू जाणवेल

की अन्न जिभेच्या चवीसाठी नाही,

तर शरीर आणि मनाच्या कार्यक्षमतेसाठी आहे.


योग्य इंधन मिळालं की शरीर हलकं, पोट शांत, मन प्रसन्न,

आणि दिवसाचा प्रत्येक क्षण उत्साही वाटतो.

चुकीचं इंधन मिळालं की शरीर जड, मन अस्वस्थ,

आणि थकवा हा कायमचा सोबती होतो.


*अन्नाचा खरा अर्थ*

खरं पाहिलं तर अन्न म्हणजे केवळ पदार्थ नाहीत,

ते म्हणजे जीवनाला चालना देणारं शुद्ध इंधन.

आणि हे इंधन शुद्ध ठेवलं, तर जीवनही अधिक प्रकाशमान, ऊर्जावान आणि आनंदी होतं.


*म्हणूनच, उपदेश नको, नियम नको-*

*फक्त जागरूकतेने प्रयोग करा.*

तुमच्या शरीराला काय योग्य आहे हे स्वतः अनुभवा.

आणि एकदा हे उमगलं की,

अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर जीवनाचा ऊर्जा-स्त्रोत आहे,

हे मनापासून पटेल.


एक अन्नमय चिंतन:

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page